भाईंदर : दिनांक ०२.०९.२०२१ रोजी संदिप बॅलिस्टर सिंग यांचे ‘भाईंदर वाईन शॉप हे दुकान रात्री बंद केल्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाठीमागील दरवाजा तोडुन आत प्रवेश करून वाईन शॉपचे काउंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम ०२.५३,८८२/- रु. तसेच वेगवेगळया कंपनीच्या दारुच्या ३५ बाटल्या असे एकुण ०३,७९,७७६/- रु. चोरी करून नेल्याची तक्रार दिली असून त्यानुसार नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाची लवकरात लवकर उकल होण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ व आजुबाजुचे परिसरातील पाहणी करून वेगवेगळया स्वरूपातील पुरावे प्राप्त केले होते. पडताळलेल्या पुराव्यांमध्ये सदरचा गुन्हा ३ आरोपींनी केला असल्याचे दिसून आले. प्राप्त पुरावे व माहितीच्या आधारे गुन्हयाचा कौशल्यपुर्ण व कसुन तपास करुन घरफोडी करणारे आरोपी सोनू ओमप्रकाश झंझोत्रे वय : ४० रा. जलालुद्दीन मस्जिद, मिरारोड पूर्व, तसेच त्याचे दोन साथीदार यांना अवघ्या दोन दिवसांत अटक करुन रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली ऍक्टिवा मोटार सायकल व दारुच्या बाटल्या असा एकुण ०२,५३,८८२/- रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्हयाची उकल करुन नवघर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. नमुद गुन्हयात अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीविरुध्द घरफोडी चोरीचे व इतर असे एकुण २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळुन आलेली आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि.प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि.योगेश काळे, पोउनि.संदिप ओहळ, पोना.रविंद्र भालेराव, पोना. ऐन्नोद्दीन शेख, पोशि. संदिप जाधव,पोशि. युनुस गिरगावकर, पोशि. आमीतकुमार पाटील यांनी केली आहे.
