नवघर पोलीसांनी बेकायदेशीर ठेव योजना राबविणा-याचा केला पर्दाफाश.

Crime News

भाईंदर :  नवघर पोलीस ठाणे यांना माहिती प्राप्त झाली कि  भाईंदर पुर्वेस पंचरत्न को. ऑ. सोसा. येथे रविंद्र शिवाजी जरे नावाचे इसमाने अस्मिता इंटरप्राईजेस या प्रोप्रायटरशीपच्या नावाने बेकायदेशीररित्या ४० आठवडे मुदतीची बोगस गुंतवणुक योजना सुरु करून गुंतवणुक रक्कमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवडयात दुप्पट रक्कम, त्याचप्रमाणे गुंतवणुक योजनेचा प्रसार व प्रचार करुन गुंतवणुकदारांना आकर्षीत करणा-या एजंटला देखील १ ते ४ टक्के पर्यंत कमीशन देण्याचे अव्यवहार्य व अवाजवी आमिष दाखवून सामान्य नागरीकांकडून गुंतवणुका स्विकारल्या. या योजनेनुसार किमान रक्कम रुपये १० हजार गुंतवणुक करणे आवश्यक असुन कमाल रक्कम मर्यादा ही गुंतवणुकदाराचे क्षमतेनुसार कितीही गुंतवणुक करता येऊ शकते, असे योजनेचे स्वरुप होते. यानुसार १० हजार रुपये गुंतवणुक रक्कमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवडयात रुपये २० हजार असे दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याचप्रमाणे एजंटला देखील १ ते ४ टक्के कमीशन देण्याचे आमिष दाखविले होते. अशाप्रकारे अतिशय  अवाजवी कमिशनचे  आमिष दाखवुन गुंतवणुक करण्यास सामान्य नागरिकांना  प्रवृत्त  केले असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी खाजगी व्यक्तीसह जाऊन योजनेची  माहिती घेतली असता नमुद इसम हा गुंतवणुक योजना व त्याबाबत परतावा आणि त्याचेकडे प्राप्त होणा-या ठेवींचा तो काय विनीयोग करतो याबाबत विचारणा केली असता, त्याने गुंतवणुक रक्कम घेण्यासाठी रितसर त्याची कंपनीची आरओसीकडे नोंदणी केली असल्याचे सांगितले व ठेवी रकमा तो शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुक करित असल्याचे सांगीतले व त्यामधुन त्यास होणा-या नफ्यातुन तो गुंतवणुकदाराना प्रती आठवडा ५ टक्के परतावा देत असल्याचे सांगितले. तसेच अन्य गुंतवणुकदार एजंट मार्फत गुंतवणुकीस आणल्यास एजंटला देखील २ टक्के कमीशन दिले जात असल्याचे सांगितले. त्यावरून  संशईत रविंद्र जरे हा गुंतवणुक योजना घेण्याबाबत अधिकार असल्याबाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र अथवा मान्यता दाखवू शकला नाही. त्यामुळे संशईत हा सेबी, आरबीआय किंवा अन्य कोणत्याही नियामक यंत्रणाची मान्यता नसतांना बेकायदेशीरपणे गुंतवणुक योजना मोठया प्रमाणावर अवाजवी परताव्याचे आमिष दाखवुन राबवत असल्याचे पोलिसांन च्या निदर्शनास आले.

सदर बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या  मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे व.पो.नि. मिलिंद देसाई व सोबत इतर अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी याच्या  कार्यालय व त्याच्या राहत्या घरी  अशा दोन्ही ठिकाणी झडती घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेशी चर्चा करुन ०२ पथके तयार करुन दिनांक २८/१/२०२२ रोजी एकाचवेळी दोन्ही ठिकाणी झडती घेण्यात आली. झडती दरम्यान अटक आरोपी याच्या कार्यालयामधुन बेकायदेशीर गुंतवणुक योजना राबवत असल्याबाबतची गुंतवणुकदारांची यादी, गुंतवणुकदारांना देण्यात आलेल्या पावत्या, गुंतवणुकदारांना देण्यात येत असलेला परतावा दर्शविणारे माहिती पञक, एजंटना दयावयाचे कमिशन याबाबतचे माहितीपञक इत्यादी कागदपत्रे त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणाहून रोख रक्कम ११,७१,५००/- इतकी रक्कम जप्त करण्यात  आली. तसेच जप्त कागदपत्रावरुन आरोपीने जुन २०२१ पासुन सुमारे ५८७ गुंतवणुकदारांकडून रुपये २,७३,६८,०००/-इतकी रक्कम बोगस ठेव योजनेद्वारे गोळा केली असल्याचे व लेव्हल १ ते ४ या दरम्यानच्या एजंट यांना १ ते ४ टक्क्यापर्यंत कमीशन दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुध्द नवघर पोलीस ठाणे येथे बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध  अपराध केला  असुन त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात  आली आहे. पुढील तपास  व.पो.नि. मिलिंद देसाई, नवघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -०१, डॉ. श्री. शशीकांत भोसले, सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे वपोनि. श्री. मिलिंद देसाई, पो.नि. सुशिलकुमार शिंदे, पोउपनि/राम कदम, पोउपनि/प्रमोद पाटील, सहा.फौज.खोत, पोहवा/संजय पाटील, पोहवा/अदक, पोना/प्रशांत वाघ, पोशि/नवनाथ माने, पोना/राठोड, मपोना/वैशाली उगले, पोशि/आकाश वाकडे, म.होम. शेलार, म.होम. चव्हाण यांनी केलेली आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply