भाईंदर : हिऱ्याचे व सोन्याचे दागिने डिझाईन करण्याचा मधुसुदन विश्वनाथ घोष वय ३६ वर्षे यांचा व्यवसाय असून त्यांच्या कारखान्यामध्ये दागिन्यांना डिझाईन करण्यासाठी त्यांना कारागिरांची गरज होती त्याचवेळी बिश्वनाथ यांस कामावर ठेवले. मुधसुदन घोष यांनी दिनांक १०.०९.२०२१ रोजी बिश्वनाथ यांच्याकडे १३,७६,०००/- रु. किंमतीचे सोने व हि-याचे दागिने, सोन्याचे कानातील रिंग व सोन्याची अंगठी असे डिझाईन करण्यासाठी दिले, मात्र कारागीर बिश्वनाथ हा दागिने घेवून दि. ११.०९.२०२१ रोजी कुणालाही न सांगता पळुन गेला हे लक्षात घोष यांनी नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार केली असता आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला. मधुसुदन विश्वनाथ घोष, यांनी कामावर ठेवलेल्या कोणत्याही कारागीरांचे पुर्ण नाव व पत्ता किंवा कोणतेही ओळखपत्र याची माहिती न घेता कामावर ठेवले त्यामुळे आरोपी हा सर्व माहिती गोळा करून मधुसूदन यांच्याकडे काम मागण्यास आला असावा असा अंदाज पोलिसांना आला त्यादृष्टीने पोलीस पथकाने तपासाची गती वाढवुन आरोपीचा कोणताही पुरावा किंवा कुठल्याही प्रकारची माहिती नसतांना गुन्हयाचा तांत्रीक दृष्टीने तपास करुन बातमीदारांमार्फत अवघ्या एका दिवसात आरोपीस आंबोजवाडी येथील झोपडपट्टी, मालवणी, मालाड, मुंबई येथुन अटक करून आरोपीकडुन ने पळून नेलेले सर्व सोने व हिऱ्याचे दागिने असे एकूण १३,७६,०००/- रु. किं.ची संपुर्ण माल , नवघर पोलीस ठाणे यांनी हस्तगत केला असुन गुन्हयाची उकल करुन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/संदिप ओहळ, पोना. रविंद्र भालेराव, पोना. ऐन्नोद्दीन शेख, पोशि. संदिप जाधव,पोशि. युनुस गिरगावकर, पोशि. आमीतकुमार पाटील पाटील यांनी केली आहे.
मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात दागिने डिझाईन करणा-या व्यवसाय धारकांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागीरांचे पुर्ण नाव, सध्याचा व गावचा पत्ता, ओळखपत्र व फोटो अशी माहिती घेणे जरुरीचे आहे. अशा प्रकारचे आवाहन नवघर पोलिसांनी व्यवसायिकांना केले आहे.
