शांतीनगर, मिरारोड पुर्व, येथील एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड शॉपवर ०५ अनोळखी आरोपीने सोने खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानात येवुन फिर्यादी त्यांना सोन्याचे दागीणे दाखवत असताना आरोपींनी त्यांचेकडील पिस्टलचा धाक दाखवुन एकुण १,५४,२९,७२२/- रुपये किमतीचे सोन्याचे-डायमंडचे दागीने दरोडा टाकुन जबरीने चोरुन नेले.
सदर बाबत नयानगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४/२०२१,भा.दं.चि.सं.कलम ३९४,३९५,३४ सह भारतीय हत्यार कायदा अधिनियम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने गुन्हयाचा तपास तात्काळ गुन्हे शाखा युनीट-१ मिरारोड यांचेकडे वर्ग करण्यात आला.
पोनि/जितेंद्र वनकोटी, गुन्हे शाखा युनीट-१ मिरारोड यांनी पोनि/प्रमोद बडान व गुन्हे शाख्नेचे पथकाचे मदतीने सदर गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तांत्रीक तपास केला, अथक परिश्रम घेवुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन आरोपीचा माग काढुन प्रथम ०३ आरोपी १) दिनेश कलव निशाद, २) शैलेंद्र उर्फ बबलु मुरारी, ३) विनयकुमार उर्फ सिटु चंद्रहास सिंह, तिन्ही मुळ रा. उत्तर प्रदेश यांना उत्तर प्रदेश येथुन अटक करून आरोपीकडूण ५५२ ग्रॅम सोन्याचे दागीणे किमत ३१,०००००/-रुपये, रोख रक्कम १४,१९,०००/- रुपये, ०१ रिवाल्चर (अग्निशस्व), ३७ जिवंत काडतुस, एक देशी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र), १ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.
पाहिजे आरोपी ४) सोनुमहिपाल सिग, रा. उत्तर प्रदेश यास जुन्या गुन्हयात अटक हावुन तो गाजीपूर कारागृहात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यास कारागृहातुन ताब्यात घेण्यात आले असुन, पाहिजे आरोपी ५) संजित रामसुन सिंह, रा. अग्रवाल नगरी नालासोपारा यास मुंबई येथुन ताव्यात पेवुन गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपीची दिनांक ०८/०२/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोटडी मजुर आहे. अटक आरोपी हे सराईत असुन आरोपी क्र. २ विरुद्ध ०६, आरोपी क्र. २ विराद्ध ०७, आरोपी क्र. ०३ विरद्ध ११, आरोपी क्र. ४ विरुद्ध ०१, आरोपी क्र. ५ विरुद्ध ०२ गुन्हयांची नयानगर पो.स्टे. उत्तरप्रदेश येथील पोलीस ठाण्यांमध्ये नाद असुन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च कलम ३ (१) (ii), (२) &३ (४) अन्वये कारवाई करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास श्री. शशिकात भोसले, सहाय्यक पोलीस आयुवत, नवपर विभाग हे करीत आहेत.
