दिनांक : ०७/१०/२०२१ : तक्रारदार या आपल्या पती व त्यांचा मानलेला मुलगा अशिष जानवेद यादव वय-२३ यांच्या बरोबर दिनांक:०६/१०/२०२१ रोजी रात्रौ ०९.४५ वा.चे सुमारास असतांना आशिष व आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्यास संशय येत होता तोच राग मनात धरून आरोपी ने अशिष यादव याच्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकुने मानेवर गंभीर जखमी केले. यावरून त्यांनी दिनांक : ०७/१०/२०२१ रोजी विष्णू नगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने व आरोपी यांच्या पत्नीला हि जिवाला धोका असल्याने गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ ताब्यात घेणे आवश्यक असल्यामुळे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ भालेराव यांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री. गणेश वडणे, सहा. पोलीस निरीक्षक, पो.हवा.पाटणकर, पो.कॉ.क. भामरे व पो.कॉ.मिळास यांचे पथक नेमले. आरोपीने आपला मोबाईल बंद केल्यापासुन त्याचे लोकेशन मिळण्यास पोलिसांना अडचण निर्माण होत होती. तसेच त्याने मोबाईल बंद केल्यानंतर शेवटच्या लोकेशनच्या आधारे त्याचा माग घेत असताना त्याच्या मुळ गावी रत्नागीरी येथे पथक जात असताना त्याने अचानक नवीन सिम कार्ड टाकुन मोबाईल चालू केला व एक कॉल करुन पुन्हा मोबाईल बंद केला त्यामुळे तपासाची दिशा बदलली. त्याचा ठावठिकाणा गुजरात राज्याच्या सिमेलगत, पालघर जिल्हयात डहाणु, घोलवड येथे गावच्या आजुबाजूला असल्याचा पोलीस पथकास संशय असल्याने सदर पथक हे माणगाव, रायगड येथून परत पालघर येथे जावून गुजरात सिमेजवळून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास पोलीस ठाणे येथे आणुन तपासी अधिकारी श्री. राहुन खिलारे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) याचे ताब्यात देण्यात आला. सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास हा महिला पोलीस उपनिरीक्षक कपिले यांनी केला आहे.
सदरची कारवाई हि श्री. सचिन गुंजाळ सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. जयराम मोरे सो डोंबिवली विभाग व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंढरीनाथ भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीरण अधिकारी स.पो.नि.श्री गणेश वडणे पोहवा.पाटणकर, पोशि. भामरे, पोशि. मिसाळ यांनी तसेच दुसरे पथकातील पो.ना. सांगळे, पो.ना. लोखंडे, पो. ना.क.कांगुणे यांनी सदरची करवाई यशस्वी पणे पार पाडली आहे. नमुद गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुल खिलारे हे करत आहेत.
