वसई – चारित्र्याच्या संशयावरुन आईची हत्या करणा-या मुलास २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यास मांडवी पोलीसांना यश. अधिक माहीतीनुसार मांडवी पोलिस ठाणे येथे अविनाश वसंत मोर वय ३६ वर्षे, रा. पाली पो. पोशेरी ता. वाडा जिल्हा. पालघर हे तक्रार घेवुन आले की,दिनांक.२०/०८/२०२३ रोजी ८. ३० ते ०९. ०० चे दरम्यान त्यांची बहीण सौ. सोनाली सुनिल घोगरा वय ३५ वर्षे, रा. नाईकपाडा, देपीवली गांव पो. पारोळ ता. वसई जिल्हा. पालघर हीच्या मानेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी धारदार हत्याराने वार केल्याने तीला इंदीरा गांधी मेमोरीयल हॉस्पीटल भिवंडी येथे उपचारासाठी तीचे नातेवाईक घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी तीला मृत घोषीत केले. तिची हत्या झाल्यामुळे अविनाश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध मांडवी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हयातील मयत हीस जीवे ठार मारणा-या अज्ञात इसमाचा शोध घेण्याचा वरिष्ठांनी मांडवी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. मयत महीला राहत असलेले गांव हे आदिवासी पाडा असल्याने सदर गांवामध्ये आणि आजुबाजुला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, तसेच आरोपीने गुन्हा करताना मोबाईलचा वापर केला किंवा नाही हे समजुन येत नसल्याने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करणे पोलिसांना जीकरीचे जात होते,त्यामुळे सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.
मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मांडवी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मयत महीला हीच्या गावात जावुन गावातील लोकांना विश्वासात घेवुन कोणताही तांत्रिक पुरावा नसताना गुप्त माहीती काढुन तीन संशयीत इसमांना ताब्यात घेतले. सदर तीनही इसमांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सांगितले की, मयत महीला ही नेहमी कोणाशी तरी मोबाईलवरुन बोलते व तीचे कोणाशी तरी संबंध आहेत याबाबत मयत महीला हीच्या मुलाने स्वताच्या आईच्या चरीत्र्यावर संशय घेवुन आई घरात झोपलेली असताना आईच्या मानेवर आणि चेह-यावर धारदार लोखंडी पात्याच्या कु-हाडीने जोराने मारुन जीवे ठार मारले. या त्यांनी दिलेल्या जबाबी वरुण त्या मुलास पोलिसांनी असल्याचे ताब्यात घेतले. नमुद मुलगा हा विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यास मा.बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला पुढील आदेशापर्यंत भिवंडी येथील बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कामगिरी श्री.सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ – ३ विरार,श्री.रामचंद्र देशमुख,सहाय्यक पोलीस आयुक्त सो. विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रफुल्ल वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. मांडवी पोलीस ठाणे, श्री. अशोक कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मांडवी पोलीस ठाणे तसेच मांडवी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स. पो. नि. संदिप सावंत, बालाजी मुसळे,पो.हवा. लक्ष्मण तरवारे, मोहन जाधव, गजानन देसले, राजेंद्र फड, संदेश घेगडमल, पो.अं. विशाल भगत,गजानन गरीबे, अमोल साळुंखे, गणेश ढमके यांनी केली आहे.
