नालासोपारा : फिल्म इंडस्ट्रीमधील शार्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून २ अल्पवयीन मुलींवर जबरी /अनैसर्गिक संभोग करून त्यांच्याकडून खंडणी उकळणा-या नराधमास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासात अटक केली . अधिक माहिती नुसार पीडित मुलगी हि १३ वर्षाची असून आरोपी याने मुलीशी डिसेंबर २०२१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर असून नवनवीन मुलामुलींचे फोटो शुट व पोर्टफोलियो तयार करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो असे सांगितले. त्याने पीडितेला व तिच्या मैत्रिणीला फिल्म मध्ये काम द्यायचे आमिष दाखवुन त्यांचे फोटो मागितले व त्यानंतर शॉर्ट फिल्मसाठी एकांत ठिकाणी भेटण्याचा आरोपी याने तगादा लावल्यामुळे पिडित अल्पवयीन मुली या आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी जावून भेटल्या असता आरोपीने मुलींना त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक व नैसर्गिक संभोग केला. तसेच त्यांचे सोबत संभोग करीत असताना त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन सदरचे चित्रीकरण सोशलमिडीया प्लॅटफार्मवर व्हायरल करण्याची धमकी देवुन फिर्यादी कडुन ७०,०००/- रुपये ची खंडणी घेतली या सर्व घडलेल्या प्रकारमुळे घाबरलेल्या पीडित मुलीने दिनांक ०९/०५/२०२२ नालासोपारा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडितेवर घडलेल्या गुन्हयांचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाख्नेचे एक पथक सपोनि/दत्तात्रय सरक, पोना/संग्राम गायकवाड, पोअं/सुशिल पवार हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व आरोपी बाबत अधिक माहिती घेऊन त्याचे सोशल मिडिया अकाउंटचे तांत्रिक विश्लेषन करून आरोपीबाबत माहिती प्राप्त करून नवीमुंबई येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी लॉरेन्स प्रिडन लुईस ता. पनवेल जि. नवी मुंबई यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्हयासंदर्भात सखोल विचारपूस केली असता, सदरचा गुन्हा हा त्यानेच केल्याचे पोलिसांसमोर कबूल केला असून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासात गंभीर गुन्हयाची उकल करण्यात यश संपादन केले असून सदर आरोपी विरुध्द न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे हि एकूण ४ गुन्हे दाखल आहेत . तरी आरोपीस पुढील कारवाई साठी नालासोपारा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाख्नेचे प्रभारी पो. नि. राहुल राख, सपोनि/दत्तात्रय सरक, पोना/राजाराम काळे, पोना/संग्राम गायकवाड, पोअं./ सुशील पवार यांनी केलेली आहे.
