मुंबई : मेघवाडी पोलीस ठाणे यांनी दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी चोरी केलेल्या एकूण १० दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत . मिळालेल्या माहिती नुसार दिनांक २८/०३/२०२२ रोजी मंगेश श्रीपत सावंत, वय ३० वर्षे, यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती कि दि. २७/०३/२०२२ रोजी त्यांनी आपली दुचाकी श्यामनगर तलावाशेजारी, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई येथे पार्क केलेली होती ती त्या ठिकाणावरून चोरी झाली होती त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि सतिश चौगले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित इसम अमित अशोक तावडे, वय ३० वर्षे, यास अंधेरी पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर पुढील तपासा दरम्यान आरोपी खलील अहमद अब्दुल मजिद खान, वय ३५ वर्षे, यास कुर्ला पश्चिम, मुंबई येथुन अधिक तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले . नमुद गुन्हयात दोन्ही आरोपींचा सहभाग असल्याने स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून आरोपी अमित तावडे यांच्याकडून खलील अहमद याने अश्या चोरीच्या एकूण ११ दुचाकी खरेदी केल्याचे आरोपी ने कबूल केले .
दोन्ही आरोपींकडुन उपरोक्त नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान एकुण ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असुन एकुण हस्तगत मालत्तेची अंदाजे किंमत:०३,६०,०००/- रूपये इतकी आहे. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या मालमत्तेवरून मेघवाडी पोलीस ठाणे येथील एकुण ०४ गुन्हे उघडकीस आलेले असुन, इतर हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकींचे मालकांचा शोध पोलीस घेत आहे .
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस उप आयुक्तसो डॉ. महेश्वर रेडडी, परिमंडळ –१०, मंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहायक पोलीस आयुक्त, डॉ. अविनाश पालवे, मेघवाडी विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजीव पिंपळे, मेघवाडी पोलीस ठाणे यांचे सुचनानुसार सपोनि श्री सतिश चौगले, पोनाक. खुले, पोशिक. /शेख, पोशिक / वरठा, पोशिक /पाटील, पोशिक / सोनवणे यांनी पार पाडली.
