वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे त्यावर कायदेशीर बंदी व्हावी आणि अशा प्रकारचे गुन्हे कुठेही आढळल्यास चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना वेळीस अटक करावी असे आदेश भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस उपायुक्त श्री. गणेश चव्हाण सो.(परि-२) यांनी परिमंडळाचे प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांना दिले आहे.
त्यानुसार मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. प्रशांत ढोले सो भिवंडी पूर्व विभाग आणि वरिष्ठ सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती. ममता डिसोझा शांतीनगर पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या चोरांना तात्काळ अटक करून आणणे अशी सूचना दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शांती नगर पोलीस ठाणे हद्दीत तपास पथकाने पोलीस उपनिरीक्षक श्री.भिका भवर आणि कर्मचारी यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून मोटर सायकल चोरी करणारे मारूफ अब्दुल अंसारी (वय२६) राहायला, भिवंडी यांस दिनांक. ३/११/२०२० रोजी शांती नगर पोलीस ठाणे गु.र.क्र. ५९२/२०२० भा.द.वि कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सदर आरोपीला माननीय न्यायालयात दिनांक. ५/११/२०२० रोजी हजर करण्यात आले. आरोपीची पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली होती. अब्दुल अंसारीने या गुन्ह्यात त्याचा साथीदार इकलाक अहमद अली अंसारी (वय३४) याच्यासह भिवंडी शहरातून तसेच कल्याण मधून मोटरसायकल चोरी केल्याची कबूली दिली.
सदर आरोपींकडून शांतीनगर पोलीस ठाणे कडील ६ मोटर सायकल, नारपोलीस पोलीस ठाणे कडील १, भिवंडी शहर पोलीस ठाणे कडील १ वाहन तसेच बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण कडील १ मोटरसायकल असे एकूण वाहन चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणून एकूण ४,६०,०००/- रुपये किंमतीच्या ९ मोटर सायकल ताब्यात घेण्याची धडाकेबाज कामगिरी शांतीनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे.
सदर कारवाई माननीय पोलीस उपायुक्त श्री. योगेश चव्हाण सो. (परि-२) भिवंडी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री.प्रशांत ढोले पूर्व विभाग भिवंडी, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. ममता डिसोझा शांतीनगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाणे तपास पथकाने पोलीस उपनिरीक्षक श्री.भिका भवर, पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी केली आहे.
