विरार : मोटारसायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना विरार पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींवर दाखल असलेल्या ०५ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. अधिक माहिती नुसार गेल्या काही महिन्यांपासून मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात स्कुटर व मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सर्वाना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ विरारचे पोलीस पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आरोपींबाबत तांत्रीक पुरावे हस्तगत करुन मिळालेलया गुप्त माहितीच्या आधारे संशईत १) आमिर अब्दुल वाहीद कुरेशी वय २६ वर्षे, रा. नालासोपारा पश्चिम, २) मोहम्मद अरशद जलालुद्दीन अंन्सारी वय – २६ वर्षे, रा. रुम नंबर नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कौशल्यपुर्वक तपास करून १) विरार पोलीस ठाणे २) अर्नाळा सागरी पोलीस ठाणे ३)नालासोपारा पोलीस ठाणे ४) नयानगर पोलीस ठाणे ५) ५ नारपोली पोलीस ठाणे (ठाणे शहर) याठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. \
आरोपी यांना विरार पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन गुन्हयाच्या तपासादरम्यान त्यांचेकडुन गुन्हयातील २,९६,०००/- रु किंमतीच्या ५ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा कक्ष -३ कडुन करण्यात येत असुन अटक आरोपी यांना दिनांक पोलीस कोठडी मंजुर आहे.
वरील कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) अति कार्य. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे), मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि/ प्रमोद बडाख, पोउपनिरी/ शिवाजी खाडे, पोउपनिरी/ उमेश भागवत, पो.हवा/ सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, पो.ना/ मनोज सकपाळ, पो.अं./ राकेश पवार, अश्विन पाटील, सर्व नेम- गुन्हे शाखा, कक्ष -३ यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
