भाईंदर :हर्ष स्टील इंडिया या कंपनीच्या दुकानाचे शटर दिनांक १५/०१/२०२२ ते १७/०१/२०२२ दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडून दुकानातील स्टिल भांडी तयार करण्याचा कच्चा माल (सर्कल) ने भरलेल्या ०१,५०,०००/- रु. किंमतीचा १५०० किलोग्रॅम वजनाच्या १५ ते २० गोणी असा माल चोरी केला याबाबत दुकानाचे मालक हर्ष महेश अग्रवाल, वय २३ वर्षे, यांनी तक्रार दाखल केली त्यावरून नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर घटनेप्रमाणे मिरा-भाईंदर परिसरात वाढत्या घरफोडी व इतर चोरीच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हयाची लवकरात लवकर उकल करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटी करण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या ठिकाणावरील व इतर ठिकाणावरील सी.सी.टिव्ही कॅमेरांचे फुटेजची पाहणी केली. व त्यावरून सदरचा गुन्हा हा २ आरोपी यांनी २ तीन चाकी सायकलींचा वापर करुन माल चोरी केला असल्याचे तपासात दिसुन आले. प्राप्त सी.सी.टिव्ही फोटो इमेज व बातमीदारांमार्फत तपास करुन दोघापैकी आरोपी अझरुद्दीन अताऊल शेख, वय २४ वर्षे, यास अटक करण्यात आली असून आरोपीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा पोलिसानं समोर कबूल केला असून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात नवघर पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ.शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग, श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/योगेश काळे, पोउनि/संदिप ओहोळ, पोना/ भुषण पाटील, पोशि/गणेश जावळे, पोशि/संदिप जाधव, पोशि/सुरज घुनावत, पोशि/विनोद जाधव यांनी केलेली आहे.
