वालीव : दुकानाचे पत्रे उचकटून कॉपर चोरी करणा-यांस अटक करुन चोरीस गेलेला २ लाख रुपयांचा पुर्ण मुद्देमाल वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेने हस्तगत केला आहे. अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव येथे रात्री कुणीतरी इलेक्ट्रिक च्या दुकानाला लावलेले सिमेंटचे पत्रे काढून दुकानातील तळ मजल्यात ठेवलेल्या पॉलीकॅप कंपनीची कॉपर वायर एकूण ०१,९६,२४५/रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरी करून घेऊन गेले त्याबाबत दुकानदाराने वालीव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथक करीत होते त्यांनी गुन्हा घडला त्या घटनास्थळावरुन तांत्रीक पुरावे हस्तगत करून तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे चोरी करणारे व चोरीचा माल विकत घेणारे आरोपी १) रसुलन खातुन ऊर्फ रुबी तस्लीम अन्सारी वय- ३० वर्षे वसई पूर्व, २) सुरेश नाथुलाल पटेल वय- २२ वर्षे, रा.वसई पुर्व, यांना दिनांक १९/५/२०२२ रोजी अटक करुन गुन्हयातील ०१,९६,२४५/- रुपये किंमतीचा माल व गुन्हयात वापरण्यात आलेली ९५,०००/- रुपये किंमतीची सुझुकी कंपनीची मोटार सायकल असा एकुण ०२,९१,२४५/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरील कामगीरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, राजेंद्र फड पोना. सचिन दोरकर, सतिष गांगुर्डे, पो.अंम. गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
