दिवसा ढवळ्या स्वस्तात सोने विकण्याच्या बहाण्याने एक ग्राहकाला तिघांनी लुबाडले

Crime News

नवी मुंबई: सात ते आठ टक्के कमी दराने सोने विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाला व त्याच्या सहकाऱ्याला सोने घेण्याच्या बहाण्याने पावणे एमआयडीसीमध्ये बोलावून त्यांच्याजवळची १८ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
नेरूळ परिसरात राहणारे जगन्नाथ आहेर याचे मित्र मुजीब खान व सय्यद अली या दोघांना त्यांच्या ओळखीतील व्यक्तीने सात ते आठ टक्के कमी दराने सोने विकत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुजीब खान व सय्यद यांनी जगन्नाथ आहेर यांना ही माहिती दिल्यानंतर जगन्नाथ आहेर यांनी आपले मित्र हरीसिंग याला याबाबत सांगून मुलीसाठी हे सोने विकत घेणार असल्याचे सांगितले होते. हरीसिंगला त्यांच्यासोबत सोने विकत घेण्याबाबत सुचविले होते. मात्र सध्या त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याने त्यांची रक्कमसुद्धा हरीसिंगलाच भरण्यास जगन्नाथ आहेर यांनी सांगितले.

जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर चार दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन जगन्नाथ आहेर यांनी दिल्याने हरीसिंग याने आपले मित्र व नातेवाईकांकडून जुळवाजुळव करून १८ लाख रुपये जमविले. जगन्नाथ आहेर, हरीसिंग व मुजीब खान हे तिघे सोने घेण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील व्हाइट हाऊस येथे कारमधून गेले होते. त्याठिकाणी सय्यद अली भेटल्यानंतर काही वेळातच सोहेलने एका व्यक्तीला पैसे घेऊन सोबत येण्यास सांगितले. त्यामुळे जगन्नाथ आहेर व सय्यद अली १८ लाख रुपये असलेली बॅग घेऊन सोहेलसोबत रिक्षामधून गेले. रिक्षा एमआयडीसीतील रुचित हॉटेलजवळ पोहोचल्यानंतर त्याठिकाणी आलेल्या अक्षय, संतोष आणि शिवकुमार या तिघांनी आहेर यांच्याकडे असलेल्या पैशांच्या बॅगेची मागणी केली. आहेर यांनी नकार दिल्याने तिघा लुटारूंनी धक्काबुक्की करून बॅग पळवली. त्यानंतर ज्या व्यक्तीने सोने घेण्यासाठी बोलावले त्यांना सय्यद अली व मुजीब खान या दोघांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद असल्याचे आढळून आले.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply