दिड वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला श्री सदानंद दाते, पोलीस आयुक्त मि.भा.व.वि पोलीस आयुक्तालय, यांनी पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे विरार पोलीस ठाणे गु.नों.र.क्र. १२३०/२०१९, भा.दं.वि.सं कलम ३०२, ३९७, ४५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विनोद पाडवी याचा शोध घेण्यात येत होता.
दिनांक २७/१२/२०१९ रोजी सौ. मनिषा मनोहर डोंबल, वय ६३ वर्ष रा. विराट नगर, विरार (प.) ह्या घरामध्ये एकट्या असतांना. दिनांक २७/१२/२०१९ कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या घरामध्ये घुसून चाकूने त्यांच्या छातीमध्ये वार करुन त्यांचा खून केला आणि त्यानंतर त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाच्या तिजोरीमध्ये असलेले १९५ ग्रॅम वजनाचे सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण ७,२८,२००/- रुपयांचा मुद्दमाल चोरी करुन नेल्याबाबत करुन नेल्याबाबत विरार पोलीस ठाणे ग.नों.र.क्र. १२३०/२०१९, भा.दं.वि.सं कलम ३०२, ३९७, ४५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापुर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी विनोद भिमसेन पाडवी हा गुन्ह्यातील चोरलेले दागिने आणि रोख रकमेसह फरार झाला होता. सदर आरोपी याचा गुन्ह्याच्या अनुषंगाने शोध घेण्यात आला मात्र तो मिळून आला नव्हता.
तांत्रीक विश्लेषण आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीन्वये आरोपी विनोद पाडवी याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्याने सन २००६ मध्ये लग्न केलेल्या भाईंदर (पू.) येथे राहणारी महिला ही तपासामध्ये पोलीसांना त्याची माहिती देईल या भितीने तिचा खून करण्याच्या इराद्याने तो नायगाव येथे आला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सापळा रचुन त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल असलेले सोने आणि चांदीच्या दागिन्यापैकी ५,३६.६३७/- रुपये किमतीचे १५० ग्रॅम वजनाचे दागिने त्याने काढून दिलेने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त परीमंडळ -३, श्रीमती रेणुका बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त,विरार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश वराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विवेक सोनवणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, आणि पथक यांनी केली आहे.
