दादर : दिनांक ७/७/२०२१ रोजी दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे एकूण १,००,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशानुसार विशेष पथक नेमण्यात येवुन दादर रेल्वे स्टेशन परिसरात नमूद गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करण्यात येत होता . त्यावेळी तपासादरम्यान एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना आढळून आला . त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला तपासादरम्यान आरोपी आहे हार्ड कोअर असल्याने वारंवार दिशाभूल करणारी माहिती पोलिसांना देत होता. तपासादरम्यान त्याच्या ताब्यात एक संशयीत चावी मिळाली त्यानुसार तो ग्रँड रोड येथील अप्पर स्टे गेस्ट हाऊस या लॉज वर राहत आहे हे निष्पन्न झाले . आरोपी चे नाव : जाहीर जमाल शेख वय : २० रा. प्लँट नं . ३२, बेलासीस रोड , मुंबई सेंट्रल , मूळ गाव : बावन्न विगा , पश्चिम बंगाल,
सदर आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला . आरोपी हा पश्चिम बंगाल चा असून तो मुंबई शहरात येवून लॉज वर राहतो व मुंबई मधील वेगवेगळ्या रेल्वे रेल्वे स्टेशन वर व रेल्वेत रात्रीच्या वेळेस बॅगा चोरण्याचं काम ठराविक दिवस करीत असून परत आपल्या मूळ गावी जात असे . आरोपी याने वरील गुन्ह्या व्यतिरिक्त सीएसमटी येथून दोन लॅपटॉप असणाऱ्या बॅगा चोरल्याची कबुली दिली . त्यास अनुसरून दादर रेल्वे पोलीस ठाणे मधील चोरीस गेलेल्या एकूण ०४ मोबाईल फोन पैकी एक मोबाईल फोन व सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथून चोरलेले दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत .
आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य करीत नाही तसेच वारंवार दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने मुंबई शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी त्याच्या दाखल असणाऱ्या गुन्हयाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून खात्री करण्याबाबतचे व आरोपी सध्या दादर रेल्वे पोलीस ठाणे चे पोलीस कस्टडीत असल्याने त्याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वपोनि काटकर यांनी केलेले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त , लोहमार्ग मुंबई , पोलीस उपआयुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर , पोलीस निरीक्षक पोवार , पो. नि. पाटील, सपोनि , घनवट यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहवा भडाळे , पोहवा हरिचंद्रे , पोहवा शिंदे, पोना . टिंगरे ,पोना पवार, पोना, खैरनार , ,पो शि . आरकड, पो शि. तांबोळी , माळी यांनी पार पाडली .
