दादर रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : पश्चिम बंगाल येथून फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची केली सुटका .

Crime News

दिनांक : २०/७/२०२१  : दादरचे वपोनि श्री. ज्ञानेश्वर काटकर यांना  प. बंगाल येथून एका अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले असून ते कलकत्ता येथून मुंबई येथे रेल्वेने येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाल्याने काटकर यांनी रात्रपाळीचे अधिकारी पोउपनि कांबळे तसेच इतर स्टाफला कलकत्यावरून येणाऱ्या प्रत्येक गाडया चेक करत असतांना पोउपनि कांबळे, मपोहवा फाळके यांना  हावडा मेल मधून सदर माहितीत वर्णन केल्याप्रमाणे एक मुलगी एका इसमासोबत उतरताना दिसली. परंतु तिने मास्क लावल्याने ओळखून येत नव्हती पण त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिला मपोहवा फाळके यांनी अडवून मास्क खाली घेण्यास सांगितले . तिने मास्क खाली घेतल्यावर सदर मुलगी तीच असल्याची खात्री पटली . म्हणून तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने सांगितले कि सदरच्या व्यक्तीशी तिची समाजमाध्यमाद्वारे ओळख झाली होती व त्याने तो स्वतः इव्हेंट मॅनेजमेंट करतो असे सांगून त्याच्या मुलाचा फोटो स्वतःच्या प्रोफाईल वर ठेवला होता व तो मीच आहे असे त्या मुलीला सांगून तुझी शाहरुख खान शी मन्नत बंगल्यावर भेट करून देतो अशी तिला आमिष दाखवले . त्या आमिषला भुलून ती त्याच्यासोबत मुंबई येथे येण्यास तयार झाली. सदर आरोपीने तिला फोन करून खोटे सांगितले कि त्याला कोरोना झाला आहे व मी माझ्या वडिलांना पाठवत आहे . असे सांगून आरोपी दि. १५/७/२०२१ रोजी मुलीच्या गावी गेला व ती ट्युशनला जात असताना तिला सोबत घेऊन चारचाकी गाडीने पलाशिपारा  येथून कलकत्ता येथे आला व तेथून हावडा मेलने मुंबई येथे आला पण त्याला दादर ला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर मुलगी अल्पवयीन असल्याने तिला बालकल्याण समिती मुंबई यांचेसमोर हजर करून तिला डोंगरी येथील बालगृहामध्ये  ठेवण्यात आले होते. आज पलाशिपारा पो. ठाणेचे पो. उपनि प्रशांत करमाकर व स्टाफ यांनी येऊन खात्री केली असता सदरची मुलगी त्यांच्याकडे दाखल असलेल्या तक्रारी मधील अपहारित मुलगीच असल्याचे दिसून आल्याने तिचा ताबा बालकल्याण समितीचे आदेशाने घेतला तसेच तिला पळवून आणणार इसम नाव : सुभान मुख्तार शेख रा. मिरारोड याची ओळख त्यांचेकडे असणाऱ्या सिसीटीव्ही फुटेजवरून खात्री करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

अशा प्रकारे दादर रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेपणामुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य वाचल्याने सर्व स्तरातून दादर पोलिसांचे अभिनंदन होत आहे .

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. कैसर खलीद सो. व पो. उपायुक्त श्री. एम. एम. मकानदार सो  यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि श्री काटकर, पोनि पोवार , पोउपनि कांबळे, पोउपनि पाटील, मपोहवा फाळके , मपोहवा सानप , मपोहवा पारावे , मपोना पिंगळे , पोहवा लिंगाळे , पोना वाघ , पोशी भंडारकर , चापोना ,मपोशी गायकवाड यांनी पार पाडली .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply