बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ा २४५/२०२०, भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१ या गुन्हयांतील फिर्यादी यांनी त्यांचा मोठा भाऊ यांचा कोणीतरी अज्ञात आरोपी यांनी कोणत्यातरी कारणावरुन कोणत्यातरी हत्याराने जिवे ठार मारुन त्यांचे प्रेत एम आय डी सी चे मोकळे मैदानातील झाडेझुडपात लपवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याबाबत दिलेल्या तक्रारी वरुन दिनांक २७/०८/२०२० रोजी ०५.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे सुचनेप्रमाणे श्री.विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशावरुन श्री. विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग व बोईसर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप कसबे यांनी तात्काळ पोलीस ठाणेतील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातुन सुचना देवुन त्यांच्या वेगवेगळया टिम तयार करुन प्रथम मयताची ओळख पटवुन आरोपी खुन करुन मागे काहीएक पुरावा ठेवला नसतांना देखिल श्री. विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग व पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप कसबे यांनी घटनास्थळाचा व आजुबाजुच्या परिसराचा नियोजन बंध तपासाचा कृती आराखडा तयार करुन वरिष्ठाचे सुचनाचे अचुक व तंतोतंत पालन करुन एकमेकांचे संर्पकात राहुन तात्रिंक पध्दतीने तपास करुन खुना सारखा गंभीर गुन्हा उघडकिस आणला असुन सदर गुन्हयात १) अबुझर लियाझ अहमद सिध्दीकी वय १९ रा.अफताब चाळ अवधनगर २) मोहम्मद अरिफ मोहम्मद ताहिर खान वय २० रा.अवधनगर यांना अटक करण्यात आलेली असुन आरोपी नं १ यांने मयत हा आपले प्रेमसंबधाबाबत तिचे घरच्याना सांगणार असल्याचे संशय मनात धरुन आरोपी नं १ व २ यांनी अपसात संगनमत करुन मयत यास गळा आवळुन ठार मारले आहे.
सदरची कामगीरी श्री.विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे सुचनेप्रमाणे श्री. विश्वास वळवी साो उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रदिप कसबे पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे सपोनि/श्री. प्रदिप पाटील, पोलीस उप निरीक्षक/हेमंत काटकर, पोलीस उप निरीक्षक/आशिष पाटील, पोलीस उप निरीक्षक/अरुण भिसे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोहवा/मर्दे, पो.ना/संजय धांगडा पोकॉ/वैभव जामदार, पोकॉ/अशफाक जमादार, पोकॉ/संतोष वाकचौरे, पोकॉ/देवा पाटील यांनी केलेली आहे.
