काशिमीरा : गुन्हे शाखा युनिट -०१ काशिमीरा यांनी छोटा राजन गँगचा व खुनाच्या गुन्हयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना १० वर्षापासुन संचीत रजेवरुन फरार असणाऱ्या आरोपीच्या मध्यप्रदेश राज्यात मुसक्या आवळण्यास यश. अधिक माहितीनुसार शिक्षा बंदी आरोपी क्रमांक ६३८४ सैय्यद आफताब अहमद हसन रा. ७०१ गौरव गॅलेक्शी फेज-२, डी विंग मिरारोड पुर्व यास बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशन, मुंबई मा. शहर सत्र न्यायालय, मुंबई यांनी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. आरोपी हा दिनांक ११/०६/२००७ रोजी पासुन नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आरोपी याची दिनांक २१/११/२०१४ ते दिनांक ०६/१२/२०१४ पर्यंत १४ दिवसांच्या संचीत रजा मंजुर करण्यात आलेली होती व तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथुन रजेवर होता. त्यास काशिमीरा पोलीस ठाणे येथे हजेरीचे ठिकाण देण्यात आलेले होते. तो कारागृहामध्ये वेळेत हजर न झाल्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा रगुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा मार्फत दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना, पो.अंम / प्रशांत विसपुते यांना मिळालेल्या माहितीवरुन आरोपी सैय्यद आफताब अहमद हसन हा हुसैन टेकरी जावरा, रतलाम मध्यप्रदेश येथे आला असुन व तो तेथुन इतरत्र कोठेतरी निघुन जाणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांनी पोलीस अधिक्षक रतलाम श्री शिध्दार्थ बहुगुणा यांच्याशी संपर्क साधुन आरोपीतयाचा शोध घेण्यास विनंती केली होती. गुन्हे शाखा-१ चे सपोनि / पुषराज सुर्वे, पो. हवा / पुष्पेंद्र थापा, पो. हवा / समिर यादव, पो. अंम / प्रशांत विसपुते असे तपास पथक आरोपी सैय्यद आफताब अहमद हसन याचा ताबा घेण्यासाठी मध्यप्रदेश राज्यात रवाना केले होते.
मध्यप्रदेश राज्यात पाठविण्यात आलेल्या तपास पथकाने आरोपी सैय्यद आफताब अहमद हसन ऊर्फ नबी अहमद हसन ऊर्फ इरफान मेहदी मुळ रा. दहीयावर सुरापुर तांडा, तह. अलिगढ, जि. आंबेडकर नगर, राज्य उत्तर प्रदेश, यास जावरा जिल्हा रतलाम मध्यप्रदेश येथे दिनांक १९/०७/२०२३ रोजी ताब्यात घेतले असुन आरोपी याचा मा. प्रथम वर्ग न्यायीक मॅजिस्ट्रेट, जावरा जिल्हा रतलाम (मध्य प्रदेश) यांच्या न्यायालयातुन ट्रान्झीस्ट रिमांड घेण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.नि./अविराज कुराडे, स.पो.नि./ कैलास टोकले, प्रशांत गांगुर्डे, पुषराज सुर्वे, पो.हवा./पुष्पेंद्र थापा, समिर यादव, पो. अंम / प्रशांत विसपुते यांनी केली आहे. तसेच एस.डी.पी.ओ. जावरा, (रतलाम) श्री रविंद्र बिलवाल पोलीस उप निरीक्षक लक्ष्मी नारायण गिरी, पो.हवा./ विक्रमसिंग राजपुत, पो.अंम/रविंद्र चौहाण, नेम. हुसैन टेकरी पोलीस चौकी, जावरा (रतलाम) राज्य मध्य प्रदेश यांनी स्थानिक मदत केली आहे.
