दिनांक.२०/०८/२०२० रोजी २०.१५ वाजता तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील श्रीरामनगर संतोष भवण, नालासोपारा पुर्व येथे एक इसम गाजा घेवुन येणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी तुळींज पोलीस ठाण्याचे पोउपनि/संदीप व्हसकोटी व त्यांचे पथकातील अधिकारी वकर्मचारी यांनी सापळा रचला असता आरोपी नामे दिपक पंचमप्रसाद विश्वकर्मा वय २० वर्षे रा.बिलालपाडा, नालासोपारा पुर्व ता.वसई, जि.पालघर यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता आरोपी याचे ताब्यातुन सफेद रंगाच्या प्लॅस्टीक पिशवीमध्ये २४,०००/-रु. किंमतीचा २००० ग्रॅम वजनाचा गांचा नावाचा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे आपले कब्जात विक्रीकरीता जवळ बाळगले असतांना मिळून आला. आरोपी याचे विरुद्ध तुळींज पोलीस ठाणे गु.र जि.नं. ७१६/२०२० एन.डी.पी.एस.अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २० प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यास दिनांक २०/०८/२०२० रोजी २०.१५ वाजता अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री.डी.एस.पाटील, प्रभारी अधिकारी तुळींज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे पोउपनि/व्हसकोटी व त्यांचे पथकाने केलेली आहे.
