दिनांक : ९/७/२०२१ :नालासोपारा येथे राहणारे दिनेश शोभाराम चौधरी वय : २६ व्यवसाय भांड्याचे दुकान , रा. हिल व्ह्यू अपार्टमेंट , रु. नं . १०५, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व यांनी तक्रार केली कि दिनांक ८/७/२०२१ रोजी सकाळी ४.०० वाजता ते दिनांक ९/७/२०२१ रोजी सकाळी ८. ०० वा. चे दरम्यान त्यांचे सुविधा स्टील सेंटर , शॉप नं , जय गणेश शॉपिंग सेंटर, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व येथील दुकानाचा मागील दरवाजा कुणीतरी अज्ञात चोरटयाने कशाचे तरी साहयाने तोडून दुकानात प्रवेश करूनदुकानातील एकूण ८०,४८४/-रुपये किंमतीचे भांडी ,इस्त्री ,कुकर , गँस शेगडी , इत्यादी माल चोरी करून नेले या बाबतची तक्रार दिल्याने तुळींज पोलीस ठाणे येथे दिनांक ९/७/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्वरित घटना स्थळी पाहणी करून गुप्त बातमीदार यांना माहिती दिलीये . तसेच पोलीस शिपाई अश्पाक जामदार यांनी तांत्रिक बाबींचा वापर करून सदर गुन्ह्यातील दोन पुरुष व एक महिला आरोपी १) व्यकंटेश रामस्वामी कौडल वय : ४२ रा. नालासोपारा पूर्व मुळ रा. तामिळनाडू २) पार्वती व्यकंटेश कौडल वय : ३६ रा. नालासोपारा पूर्व मुळ रा. तामिळनाडू ३ ) मुरुगेश पन्नीरसेलवम कौडल वय : ४० रा. नालासोपारा पूर्व मुळ रा. तामिळनाडूयांचा मग काढून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला ४०,५९५/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचबरोबर आरोपीं यांनी अश्या प्रकारचे अजून तीन गुन्हे केले आहेत हे उघडकीस आणण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास या आले आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील , पोलीस उपआयुक्त परिमंडळ -२, श्री. अमोल मांडवे ,सहा . पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि . संदेश पालांडे , सपोनि. मिथुन म्हात्रे , पोउपनि. ज्ञानेश्वर कोकाटे , सहा. पो. उप. निरी . बाळु बांदल , शिवानंद सुतनासे , पो.हवा . अनिल शिंदे , पो.ना . आनंद मोरे, उमेश वरठा, पो. शि . अश्पाक जमादार , छपरिबन यांनी केलेली आहे.
