दिनांक :२०/०७/२०२१ : शेतकरी असलेले श्री. अमोल दगडू पहे वय : ३३ धंदा : फळ व्यापारी रा. हंगेवाडी अहमदनगर , यांना आरोपी याने अहमदनगर येथून एकूण ११२ कॅरेट डाळींब एकूण किंमत ८७,८००/- रुपयेचा माल घेऊन बोलाविले व माल स्वतःकडे घेऊन अमोल पहे यांना पैसे न देता फसवणूक करून निघून गेला. अशी तक्रार अमोल दगडू पहे यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे नोंदविली असून आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दार हे शेतकरी असल्याने त्यांची तात्काळ दखल घेण्यात येऊन आरोपी व फिर्यादी यांचे संभाषणाबाबत तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेण्यात आला.
शेतकऱ्याची फसवणूक करून गुन्ह्यातील एकूण ११२ कॅरेट डाळींब वसई रेल्वे स्टेशन च्या पूर्वेस असलेल्या पार्किंग मध्ये आरोपी प्रकाश उमेश चौधरी वय : २५ याने लपवून ठेवले होते. आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यातील संपूर्ण माळ जप्त करण्यात आला. सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणुन शेतकऱ्याला त्याचे कष्टाचा माल परत मिळून देण्यात तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -२, श्री. अमोल मांडवे , सहा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि. संदेश पालांडे , मिथुन म्हात्रे , पोउपनि . ज्ञानेश्वर कोकाटे , सहा. पोउपनि . बाळू बांदल , शिवानंद सुतनासे , पोहवा . अनिल शिंदे, पो.ना. आनंद मोरे , उमेश वरठा , पो.शि. अशपाक जमादार , छपरिबन , यांनी केलेली आहे.
