पुणे : कोरेगाव पार्क पोलीस ठाणे यांनी लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेस दिनांक ३०/५/२०२२ रोजी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार ढोलेपाटील रोड.पुणे इथे राहणाऱ्या मयुरी विनोद गायकवाड वय २३ वर्षे यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दिनांक २३/०५/२०२२ दुपारच्या दरम्यान कॅन्टोन्मेट सहकारी बँक लि.ढोलेपाटील रोड शाखा शेजारील सार्वजनिक रोड पुणे येथून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले त्यावरून मयूरी गायकवाड यांनी रेगाव पार्क पोलीस ठाणे, पुणे शहर इथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोसई अमोल घोडके व त्यांचे पथक करीत होते तपास चालू असतांना सदरचे पथक दिनांक ३०/५/२०२२ रोजी तपास करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे सदरच्या गुन्ह्यातील आरोपी महीला ही शेंडगेवाडी शिवारातील असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहीती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली सदर माहीतीच्या अनुशंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या.त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित महीला उषा नामदेव चव्हाण वय ३५ वर्षे रा.शेंडगेवाडी ता.श्रीगोंदा हीस ताब्यात घेतले असता तिच्याकडे केलेल्या चौकशी मध्ये सदर गुन्ह्यातील अपहरण करण्यात आलेलीतीन वर्षाची मुलगी मिळुन आल्याने त्यांना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोसई अमोल घोडके व पोलीस पथक यांच्या ताब्यात देण्यात आली असून सदर महिलेस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब,मा.अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले ,पोसई समीर अभंग,सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे,पोकॉ दादासाहेब टाके,पोकॉ अमोल कोतकर तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके,पोना घोडके,पोना जढर,मपोकॉ राऊत सर्व नेम कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.
