भाईंदर : महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटखा हा प्रतिबंधीत माल विक्री साठी घेऊन आलेल्या आरोपीस नवघर पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून ३ लाख ७८ हजार ५४८ चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४/४/२०२२ रोजी नवघर पोलीस ठाण्याचे पोनि/सुशिलकुमार शिंदे व पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना बातमी मिळाली होती कि तंबाखूजन्य गुटखा हा प्रतिबंधीत माल गुजरात येथून आणून तो विक्री नवघर भाजी मार्केट भाईंदर पुर्व येथे आणण्यात येणार आहे खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिलींद देसाई ,यांनी वपोनि देसाई यांनी पोलीस उप आयुक्त, परि-०१ व सहायक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांना हि माहिती अवगत करुन नवघर, भाईंदर पूर्व भाजी मार्केट येथे पोनि/सुशिलकुमार शिंदे व स्टाफ यांनी वेगवेगळी पथके तयार करुन सापळा लावून एका मारुती कार मधून गोणीमध्ये असलेला एसएचके. गुटखा, रोकड गोल्ड पानमसाला, बंदर तंबाख्नु, विमल पान मसाला असा माल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपी मुनिब रामब्रीक्ष गुप्ता, वय-३६, रा. ओम सी बिल्डींग, कस्तुरीपार्क, भाईंदर पुर्व यास त्याच्याकडे असलेल्या ३,७८,५४८/- रुपयांचा माला सकट रंगेहात पकडण्यात आले आहे. अटक केलेला आरोपी हा या कामात सराईत गुन्हेगार असून त्याच्या वर महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाकुजन्य गुटखा कब्जात बाळगणे, विक्री करणे बाबत एकूण ०५ गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परि-०१ व डॉ. शशीकांत भोसले, सहायक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/सुशिलकुमार शिंदे, पोशि/नवनाथ माने, पोशि/ जितेंद्र निवळे, पोशि/ भोये नवघर पोलीस ठाणे यांनी केली आहे. नमुद गुन्हयाचा तपास सपोनि/हनुमंत पडळकर हे करीत आहेत.
