दि.०७/१०/२०२० रोजी ११.१० वा.चे सुमारास आच्छाड बॉर्डर चेक पोस्ट आच्छाड ता.तलासरी, जि.पालघर, येथे आच्छाड बॉर्डर चेक पोस्ट आच्छाड येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई वाहीनीवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान यातील आरोपी नामे मकसुद बारक्या रेंजड, वय ३६ वर्षे, रा.उपलाट पाटीलपाडा ता.तलासरी जि.पालघर याने यांचे ताब्यातील ट्रक क्र. जी.जे १५ ए.टी.०८५१ हीचे मधून २ ब्रास अवैध रेती वाहतूक करून तलासरी त्या दिशेने चोरून घेवून जात असताना व गाडीचे कागदपत्र जवळ न बाळगता मिळून आला. सदरचे आरोपी यांचे ताब्यातुन २०,०००/- रू कीं. ची पांढरे रंगाची बारीक २ ब्रास रेती, ३,००,०००/-रू.की.चा एक पांढरे व लाल रंगाचा टाटा कंपनीचा ट्रक (डंपर) कं. जी.जे १५ ए.टी.०८५१ असा एकुण ३,२०,००००/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचे आरोपी यांचेविरुद्ध तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ा २२०/२०२-० भा.द.वि.स.क.३७९ प्रमाणे, गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.अजय वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
