पनवेल : सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक १९/०९/२०२१ रोजी गणपती विसर्जन दिवशी पनवेल मधील गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच दिवशी पोलीस शिपाई प्रशांत वाघ व पोलीस नाईक किशोर फंड हे वहाळ गावात बंदोबस्त साठी कार्यरत असतांना रात्री १०.१५ च्या सुमारास वहाळ गावातील तलावाच्या ठिकाणी पोहचले त्या वेळी तिकडे गणेश विसर्जन चालू होते. गणेश विसर्जन करण्यासाठी सुरेश जगन्नाथ शिंदे वय ४० वर्षे हे तलावात उतरून पाण्यात जात असतांना त्यांना पाण्याचा अंदाज न लागल्याने ते तलावाच्या पाण्यात बुडू लागले त्यावेळी त्याठिकाणी गणेश विसर्जनासाठी जमलेल्या गावकऱ्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली ती आरडाओरड ऐकून पोलीस शिपाई प्रशांत वाघ व पोलीस नाईक किशोर फंड हे धावत गेले व आपल्या जीवाची पर्वा न करता अतिशय धाडसाने त्यांनी पाण्यात उडी मारली पण तलावाचे पाणी खूप खोल असल्यामुळे पाण्यात बुडालेले शिंदे त्यांना मिळून येत नव्हते म्हणून पोलीस शिपाई वाघ हे पाण्यात खोलवर जाऊन स्वतः चा जीव धोक्यात टाकून शिंदे यांचा शोध घेऊ लागले अथक परिश्रमाने पाण्यात डुबक्या घेत असताना सुरेश शिंदे हे तलावाच्या मध्यभागी डुबत असतानां पोलीस शिपाई वाघ यांना आढळून आले त्यांनी त्वरेनें जाऊन त्यांना सुरक्षित रित्या बाहेर काढले व त्याच्या तोंडामध्ये फुंकर मारून त्यांच्या नाका तोंडात गेलेले पाणी बाहेर काढून त्यास तात्काळ पुढील उपचारासाठी वहाळ गाव हॉस्पिटल येथे दाखल केले व त्यांचा जीव वाचवला असून त्यांच्यावर सध्या मनपा हॉस्पिटल वाशी येथे उपचार सुरू असून ते पूर्णपणे सुखरूप आहे.
आपल्या पतीचा प्राण वाचविल्यामुळे सुरेश शिंदे यांच्या पत्नी अंबिका शिंदे ,मुलगा गणेश शिंदे यांनी पोलीस शिपाई प्रशांत वाघ यांचे मनापासून आभार मानले .
