नंदुरबार, नवापूर येथे राहणाऱ्या फिर्यादीच्या वडिलांची शिवार तालुका नवापूर येथे गट क्रमांक १०१/२ हि शेतजमीन आहे. सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फिर्यादीच्या वडिलांचे असलेल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी फिर्यादी तलाठी वर्ग-३ जयसिंग पावरा (वय-५०) याच्या कडे गेला. परंतु तलाठी जयसिंग पावरा यांनी या कामाकरिता फिर्यादीकडून दिनांक. २०/०१/२०२१ रोजी १५००/- रुपये लाचेची मागणी करून पंच आणि स्वाक्षरी करून देतो असे सांगितले.
सदरची लाच दिनांक २७/०१/२०२१रोजी मंडळ अधिकारी कार्यालय, खांडबारा तालुका नवापूर येथे पंच आणि स्वाक्षरी याच्या समक्ष स्वीकारली. त्यावरून फिर्यादीने तलाठी जयसिंग पावरा विरुद्ध लाच लुचपत विभाग (नंदुरबार) येथे लाच मागणी केल्याची तक्रार दाखल केली. याआधी लोकसेवक तलाठी जयसिंग पावरा ला २०१८ साली लाच घेताना नंदुरबार युनिटने तलाठी कार्यालयात पकडले होते. परंतु आता कर्तव्यावर हजार झाल्यानंतर त्याने त्याचे लाच घेण्याचे उद्योग पुन्हा एकदा सुरु केले. लाच लुचपत विभाग (नंदुरबार) यांना याबाबत तक्रार मिळताच तलाठी अधिकारी जयसिंग पावरा याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सुनील कडासने, नाशिक परिक्षेत्र , अपार पोलीस अधीक्षक श्री. निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.
