भाईंदर: पैशाची गरज असलेल्या कॉलेजच्या मुलींना हेरून वेश्याव्यवसायास प्रवृत्त करुन घरामध्ये वेश्याव्यवसाय चालवणा-या महिलेस अटक करुन ०१ पिडित कॉलेजच्या मुलीची सुटका अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर युनिटला दिनांक दिनांक १८.०५.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सायरा शेख उर्फ दिव्या मंगलकर रा. नवघर, भाईंदर पुर्व हि महिला वेश्यादलाल वेश्याव्यवसाय करीत असुन तिचा मोबाईल क्रमांकावर पुरुष गि-हाईकाने संपर्क साधला असता ती व्हाट्सऍपद्वारे पुरुष गि-हाईकांना मुलींचे फोटो पाठवुन पाठवलेल्या फोटोतील पुरुष गि-हाईकांनी मुलीचा फोटो पसंत केल्यानंतर वेश्यागमनाचा मोबदला ठरवुन तिच्या राहत्या घरी वेश्यागनासाठी मुली पुरविते.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर युनिटचे पो.नि. श्री. समीर अहिरराव यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन बोगस गि-हाईक व पंच यांना महिला वेश्यादलाल सायरा शेख उर्फ दिव्या मंगलकरहिच्या घरी रुम नं. ३०२, जी विग, सोनम क्रिष्णा कौ.हौ.सोसा.,न्यु गोल्डन नेस्ट, फेज-१०, भाईंदर पूर्व येथे पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह दिनांक १८/०५/२०२३ रोजी छापा कारवाई केली आसता महिला वेश्यादलाल सायरा शेख उर्फ दिव्या मंगलकर व तिची साथीदर आयेशा शेख (फरार आरोपी) यांनी आपआपसात संगणमत करुन बोगस गि-हाईकास मुलींचे फोटो पाठवुन तिस वेश्यागमनासाठी प्रवृत्त करुन वेश्यागमनाच्या मोबदल्यात रक्कम ठरवुन तिच्या घरी बोलाविले . हि वेश्यादलाल स्वतःच्या उपजिवीकेकरीता हे काम करत असून पोलिसांनी तिला बोगस गि-हाईक यांच्याकडून रक्कम स्वीकारल्याने तिस मुद्देमालासह ताब्यात घेवुन ०१ पिडित मुलीची सुटका करण्यात आली. सदरबाबत पो. अंम. केशव शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन महिला वेश्यादलाल सायरा शेख उर्फ दिव्या मंगलकर व पाहिजे आरोपी आयेशा शेख यांचेविरुध्द नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. समीर अहिरराव, स.फौ. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो. अंम. केशव शिंदे, चा. पो. हवा. सम्राट गावडे, महिला पो. अंम. अश्विनी भिलारे, महिला म.स.ब. शुभांगी मोकल सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.
