आडगांव : विश्वास भिमराव जाधव रा. नांदुर नाका नाशिक यांनी आपला ट्रक हा शहिद खैरणार पेट्रोलपंप ट्रक टर्मिनल येथे लावला असता अज्ञात चोरटयाने ट्रकचे डिझेल टाकीचे झाकन व सेन्सार तोडुन त्यामधुन २३० ते २३५ लिटर डिझेल चोरी केले असे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आडगांव पोलीस ठाणे येथे दिनांक १९/०९/२०२१ रोजी तक्रार नोंदविली त्यानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना पोना विजयकुमार सुर्यवंशी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, ट्रक टर्मिनल येथील डिझेल चोरणारे चोरटे हे मेडीकल चौफुली आडगांव येथे गाडीसह रात्रीच्या सुमारास येणार आहेत. अशी मिळताच सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री इरफान शेख यांना देण्यात येवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. हेमंत तोडकर, पोहवा भास्कर वाढवणे, पोना विजयकुमार सुर्यवंशी, पोना दशरथ पागी, पोकॉ.विश्वास साबळे, पोकॉ. देवानंद मोरे, चालक गांगुर्डे यांनी आडगांव मेडीकल चौफुली येथे सापळा लावुन मोठया शिताफिने इंडीगो कार नं. एमएच ०६ एझेड २३०१ अशी गाडी व आरोपी चंद्रबहादुर भिमबहादुर सोनार वय ३२ वर्षे रा. गोंधवणी श्रीरामपुर यास गाडीसह दिनांक २०/०९/२०२१ रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचा साथीदार असल्याचे सांगितले त्यानुसार त्याचा साथीदार सागर दत्तात्रय गरड वय २८ वर्षे रा. जोशीवाडा,नाशिक यास दिनांक २२/०९/२०२१ रोजी अटक करण्यात आली . सदर आरोपींकडून गुन्हयातील माल २२०००/- रू किंमतीचे २३० लि. डिझेल प्लॅस्टीकची नळी, लोखंडी पकड, स्कु ड्रायव्हर व एक सिलव्हर रंगाचे इंडीगो कार क्र. एमएच ०६ ए झेड २३०१ असा सुमारे १,२१,९५०/- रू किंमतीचा मुद्देमाल गुन्हयामध्ये जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयात आरोपीचे अजून तिन साथीदार यांना अटक करणे बाकी आहे. सदर गुन्हयातील दोन्ही अटक केलेल्या आरोपी यांना दिनांक २६/०९/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन आरोपी चंद्रबहादुरसिंग याचे विरूध्द गंगापुर पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामिण येथे ५ गुन्हे दाखल आहेत. यामाहितीच्या आधारे सदर आरोपीकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे .
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री दिपक पांडेय , मा. पोलीस उप आयुक्त परि. १ श्री अमोल तांबे, मा सहा. पोलीस आयुक्त, विभाग १, श्री मधुकर गावित यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री इरफान शेख, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, हेमंत तोडकर, पोहवा भास्कर वाढवणे, पोहवा सुरेश नरवडे, पोना विजयकुमार सुर्यवंशी, पोना दशरथ पागी, पोकॉ. विश्वास साबळे,देवानंद मोरे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर व चालक पोहवा गांगुर्डे सर्व नेमणुक आडगांव पोलीस ठाणे यांनी केली.
