गुन्हा रजि.नं. 02/2020 कलम 379,411 भा.दं.वि., अटक ता.वेळ – 09/03/2021 14:30 वा., गेला मला- 17,990/- रु.एक ओपो कंपनीचा गोल्डन रंगाचा मॉ.नं.एफ । एस मोबाईल फोन जु.वा., मिळाला मला-नमुदप्रमाणे, आरोपी नामे 1) रोहित चंद्रकांत पायाळ वय 24 वर्षे राह.- शाहू कॉलेज समोर, कोल्हापूर. तपासी अमलदार- पो.ना./91 हटकर हकीकत – यातील फि” हे दिनांक 01/01/2020 रोजी कोल्हापूर ते दादर अप सह्याद्री एक्सप्रेस गाडीचे एस/9 बोगीतुन सीट नं.39 वरून प्रवास करून दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.06 वर उतरत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांने प्रवाशाच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे पॅन्टचे उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन नकळत काढून चोरून नेला होता. नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करून मोबाईल IMEI नंबर ट्रेसिंग वरून नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन आज रोजी जप्त करण्यात आला आहे.
रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत तसेच वपोनि श्री काटकर यांचे मार्गदर्शनानुसार मपोहवा/641साप्ते व मपोना/2173 कांबळे यांनी खालील नमूद फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल आज दिनांक 09/03/2021 रोजी परत दिला. फिर्यादी यानी त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याने दादर रेल्वे पोलिसांचे खूप आभार मानले आहेत.
1) ACR NO- 2804/2019 कलम 379,411 भादंवि मधील जप्त केलेला 19,990/- रुपये किंमतीचा एक Samsung कंपनीचा मोबाईल
फोन फिर्यादी नामे शैलेश भानुदास अभंग वय 24 वर्ष, राह-वसई
2) ACR NO- 156/2021 कलम 379 भादंवि मधील जप्त केलेला 12,000/- रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन फिर्यादी नामे सौरभ शरद जुवटकर वय 30 वर्ष, राह-कळवा
