नालासोपारा : पेल्हार पोलिसांनी नालासोपारा येथून चार चाकी वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांस अटक केली असून त्यांनी चोरलेले ट्रक व टॅम्पो पोलिसांनी हस्तगत केला आहे. अधिक माहिती अशी कि दिनांक : २४/४/२०२२ रोजी समीम अस्लमअली खान यांनी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत जायका हॉटेल समोर, पेल्हार रोड, वाकणपाडा, नालासोपारा (पु.), येथे त्यांचा टाटा कंपनीचा ट्र्क उभा करून ठेवला असताना अज्ञात चोरटयाने चोरी करुन चोरुन नेला त्यावेळी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द पेल्हार पोलीस ठाणे येथे दिनांक २४/०४/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.तसेच दिनांक २६/४/२०२२ रोजी सोमनाथ बाबासाहेब नरुटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती कि दिनांक २५/४/२०२२ रोजी नसिमभाई यांचे सर्विस सेंटर समोर, वंगणपाडा, पो. पेल्हार, नालासोपारा (पु.), याठिकाणी टाटा कंपनीचा टेम्पो हा पार्क करुन ठेवलेला असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेला होता.
सदरील गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवून गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या व तांत्रीक मदतीच्या आधारे आरोपी १) ओमप्रकाश राममनी यादव, रा. जि. प्रयागराज, राज्य-उत्तरप्रदेश, २) बिल्ली ऊर्फ चंद्रकांत रामचंद्र शेनोरे, रा. सिन्नर, जि. नाशिक यांना वर नमुद गुन्हयांत अटक करुन त्यांचेकडून चोरीस गेलेला ट्रक व टेम्पो असा एकुण-९,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ व श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि/सनिल पाटील, पोहवा/योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, पोना/प्रताप पाचुंदे, पोअं/संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, तसेच पोहवा/नामदेव ढोणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
