दिनांक १६.६. २०२१ रोजी श्री. विलास चौगुले व. पो. नि . वालिव पोलीस ठाणे याना माहिती मिळाली कि प्रशांत सिंग हा वाद, पालघर येथून लोखंडी सळईने भरून आलेल्या ट्रकातून काही माल ट्रक चालकास हाताशी धरून काही प्रमाणात लोखंडी सळई वसई पु. येथील खैरपाडा भागात पाण्याच्या टाकीजवळ रोड जवळ टाकून चोरी करीत करत असलेबाबत बातमी मिळाली असता वपोनि विलास चौगुले यांनी वालिव पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेस कारवाई करण्याचे आदेश दिले.
माहिती नुसार वालिव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी दि . १६. ६. २०२१ रोजी सदर ठिकाणी साफळा रचून कारवाई केली असता, कारवाई मध्ये एकूण लोकांडी सळई चे भरलेले ६ ट्रेलर , एक आयसर टेम्पो व एक वेनगर कार असे एकूण २ करोड १३ लाख ३५ हजार ९७९/- रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल तसेच एकूण ९ आरोपी १) प्रशांत सिंग रा. वसई २) उमेश सिंग रा. डोंबिवली ३) सर्वेश सिंग रा. वाडा ४) रामू गौतम रा. वाडा५) संदीप गौडा रा. दिवा ६) मोहिदूर बाबर अली रा. वाडा ७) रमेश राजभर रा. संतोषभावन ८) पंकज सिंग रा. डोंबिवली ९) कमलेश वर्मा रा.विक्रोळी यांना रंगेहात पकडले .
सदर चोरी बद्दल ची तक्रार श्री. जी. कार्पोरेशन चे मालक किरीट कामदार यांनी नोंदवली होती . त्याची दखल घेत वरील कारवाई करण्यात आली . सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त , परि -२. श्री. अमोल मांडवे सहायक पोलीस आयुक्त , तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालिव पोलीस ठाणे, पोनि श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि , ज्ञानेश फडतरे, पो.हा मुकेश पवार, मनोज मोरे, योगेश देशमुख, पो.ना किरण म्हात्रे ,सचिन दोरकर, राजेंद्र फड ,अनिल सोनावणे, सतीष गांगुर्डे , पो शि विनेश कोकणी ,बालाजी गायकवाड ,सचिन बलिद , गजानन गरीबे , यांनीं केली आहे.
