वसई (पश्चिम) येथे राहणाऱ्या तरुण महिलेला विकास पाटील (वय-४२) नामक राहायला पुणे याने आपण उच्चशिक्षित असून मास्टर ऑफ आर्किटेक्ट असल्याचे भासवून जीवनसाथी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावरून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ७,८१,०००/- रक्कम मिळवून तिची कार आपल्या ताब्यात ठेवून तिच्याशी लग्न न करता तिच्याकडून घेतलेली रक्कम आणि कार घेऊन तरुणीचा विश्वासघात करून एकूण १३,८१,०००/- रुपयांची फसवणूक केली. म्हणून तरूणीने आरोपीविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाणे येथे भादवि ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील आरोपी विकास पाटीलच्या विरुद्धात गुन्हा जेव्हा दाखल झाला तेव्हापासून तो स्वतःचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलीसांनी जीवनसाथी डॉट कॉम या संकेत स्थळा कडून माहिती मिळवून तसेच तांत्रिक तपास करून दिनांक. २०/१२/२०२० रोजी पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपी विजय पाटील हा दहावी शिकलेला असून तो त्याचे नाव बदलून उच्चशिक्षित असल्याचे खोटे सांगतल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीकडून तरुण महिलेची हुंडाई कंपनीची ग्रॅण्ड स्पोर्ट्स कार हस्तगत करून एकूण ६,६४,९००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी श्री. संजय कुमार पाटील, पोलीस आयुक्त, वसई, श्रीमती. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग, पोलीस निरीक्षक. राजेंद्र कांबळे, माणिकपूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक उमेश भागवत पोलीस निरीक्षक कल्पेश केणी, पोलीस शिपाई हेमंत कोरडे यांनी केली आहे.
