सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील निळेमोरे आदिवासी पाडयातील एका इसमास अर्जुनकुमार गिरी वय २५ वर्ष, मुळ राहायला बिहार हा दारु पिऊन विनाकारण शिव्या देत होता.
त्यावेळी आदिवासी पाडयातील लोक त्यास विनाकारण लोकांना शिव्या का देतो असे समजावुन सांगत असताना जखमी व आरोपी यांच्यात वादावादी झाल्याने त्याचा मनात राग धरुन आरोपीने जखमीस गळयावर ब्लेडने वार करुन गळयास गंभीर दुखापत केली जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेला होता.
त्याबाबत दिनांक १५/०२/२०२१, रोजी नालासोपारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक.। ६९/२०२१ भादंवि कलम ३०७.५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपीला अटक करण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्याचे यरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंत लब्दे यांनी स.पो.नि. किशोर माने व तीन पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार केले. स.पो.नि.किशोर माने यांचे पथकाने आरोपी अर्जुनकुमार कपीलदेव गिरी वय २५ वर्षे, रा.आदिवासी पाडा निळेमोरे नालासोपारा प. मुळ रां. बिहार यास गुन्हा दाखल झाल्यापासुन १२ तासाचे आत दिनांक १५/०२/२०२१ रोजी अटक केलेली आहे.
सदरची कामगिरी श्री संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०२, श्री सी.एम. जाधव, सहा. पोलीस आयुक्त, नालासोपारा, श्री. वसंत लब्दे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक,नालासोपारा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक/किशोर माने, पोना/ अजित कांबळे, पोशि/सचिन मोहिते,प्रतिक पिंगळे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किशोर माने, नालासोपारा पोलीस ठाणे करीत आहेत
