जालना : पोलीस अधिकारी श्री.सुरेश खाडे सहा.पोलीस निरीक्षक प्रो.पोउपनि श्री.बोदरे अंमलदार पोकॉ/कापसे, ढाकणे हे दिनांक- १३/०९/२०२१ रोजी पोलीस ठाणे तालुका जालना हदीत रात्री गस्त घालीत असतांना टेलीकॉम कॉलनी परिसरात एका मोटार सायकलवर ट्रिपलसिट जातांना दिसली त्यांचा संशय आल्याने मोटार सायकल चा पाठलाग केला. पाठलाग करून मोटारसायकल चालवणाऱ्यास पकडले त्यास त्याचे नाव गाव विचारले असता अर्जुनसिंग छगणसिंग भोंड वय २३ वर्षे रा.गुरूगोविंदसिंग नगर सिकलकरी मोहल्ला जालना असे सांगीतले. त्याच्या सोबतचे दोन साथीदार हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.अर्जुनसिंग यास पोलीस ठाणेला आणुन विचारपुस केली असता त्याने व त्याच्या साथीदांनी आठ दिवसापुर्वी माळाचा गणपती नाव्हा रोड परिसरात रात्रीचे वेळी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हेगाराचे या पुर्वीचे रेकॉर्ड तपासुन पाहिले असता त्याच्या विरुध्द दरोडा प्रयत्न,जबरी चोरी,घरफोडी,चोरी ईत्यादी प्रकारचे एकुन १८ गुन्हे वेगवेगळया पोलीस ठाण्यात दाखल असुन पोलीस ठाणे कदीम जालना येथे दाखल दोन चोरीच्या गुन्हयांची नोंद असुन २० १८ पासुन अर्जुनसिंग हा फरार होता.अर्जुनसिंग भोंड यास माळाचा गणपती परिसरात केलेल्या घरफोडीत अटक करण्यात आली असुन दिनांक- १५/०९/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये ठेवण्यात आले आहे.
सदर फरार आरोपीस पकडण्याची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.विनायक देशमुख,अपर पोलीस अधिक्षक श्री.विक्रांत देशमुख ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.मारोती खेडकर,सहा पोलीस निरीक्षक श्री.सुरेश खाडे,विश्वास पाटील,तपास अंमलदार पोह उदलसिंग जारवाल, पोकॉ विठठल कापसे, बाळु ढाकणे,नितीन झोटे यांनी केली आहे.
