जव्हार : दिनांक २२/०७/२०२१ रोजी दुपारी २. ०० वा. सुमारास श्री. मोहसीन अहमद पठाण रा. एसटी स्टॅन्ड राजमहल समोर जव्हार ता. पालघर यांनी उभी केलेली ऍक्टिव्हा स्कुटी एका अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेल्याने जव्हार पोलीस स्टेशन पाचबत्ती नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने श्री. प्रशांत परदेशी , उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनी श्री. अप्पासाहेब लेंगरे , पोउपनि सागर पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. त्यानंतर पोनि. श्री. अप्पासाहेब लेंगरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोहवा भगवान धोंडमारे, पोना. संदीप दिघे, पोशि. मिलींद काकड , पोशि.मोहंडकर यांचे तपास पथक तयार केले,पोलीस पथकाने पाचबत्ती नाका जव्हार येथे जावून सविस्तर जावून चौकशी करून चोरी करणाऱ्या इसमांचा शोध सुरु केला असता. गुप्त बातमी दारामार्फत खात्रीलायक बातमी प्राप्त करून जव्हार येथून चोरीस गेलेली ऍक्टिव्हा स्कुटी विक्रमगड येथे असल्याची माहिती मिळाल्याने विक्रमगड येथे जावून पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांचे पथकाने एक आरोपी यास दिनांक २३/०७/२०२१ रोजी अटक करण्यात आली .
सदर आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने कसून चोकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीस मा. न्यालयात हजर केले असता आरोपीस दिन २७/०६/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. पोलीस कोठडीत आरोपीची चौकशी केली असता त्याने वालीव पोलीस ठाणे हद्दीतील ३ वाहने , व डहाणू पोलिस ठाणे हद्दीतून ३ वाहने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतून १ असे ५ ऍक्टिव्हा व २ ज्युपिटर स्कुटी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली . सदर आरोपी याचे ताब्यातून आजपावेतो एकूण ७ वाहने हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही ही श्री. दत्तात्रय शिंदें , पोलीस अधिक्षक पालघर, श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक , पालघर यांचे आदेशानुसार श्री. प्रशांत परदेशी , उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, श्री. अप्पासाहेब लेंगरे प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोहवा भगवान धोंडमारे, पोना. संदीप दिघे, पोना जयराम करकुटे ,पोना माडी , पोशि. मिलींद काकड, पोशि. चेतन मोहंडकर, पोशि. योगेश गावित यांनी केली आहे.
