बोईसर : जबरदस्तीने सोनसाखळी व मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस बोईसर पोलिसांनी अटक केली . या अटक केलेल्या आरोपी कडून एकूण ३ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले . १)दिनांक १६/०६/२०२१ रोजी १०. ३० वाजता बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात आरोपी हे मोटार सायकलवरून येवुन फिर्यादी सौ. आशा गुरुनाथ दुधावडे वय : ५२ यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेले होते . नमूद बाबत फिर्यादी यांनी बोईसर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला . २) दिनांक १५/१२/२०२० रोजी ६. ०० वा . चे सुमारास यातील फिर्यादी वय : ५५ ह्या यशवंत सृष्ठी येथील किराणा दुकानातून खरेदी करून पायी घरी जात असताना एक काळ्या रंगाच्या मोटार सायकल वरून दोन अनोळखी इसम जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करून पळून गेले याबाबत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. ३)दिनांक ८/६/२०२१ रोजी ७. ३० वा. चे सुमारास यातील फिर्यादी ह्या बालाजी कॉम्प्लेक्स ते परळी नका येथे पायी फिरून घरी जात असताना मोटार सायकल वरून दोन अनोळखी इसम जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करून पळून गेले. याबाबत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तारापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. श्री. दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक , पालघर , मा. श्री. प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक , पालघर व श्री. विश्वास वळवी , उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोपोनि श्रीकांत शिंदे ,वाणगांव पोलीस ठाणे , व पोउनि शरद सुरळकर , बोईसर पोलीस ठाणे , पोउपनि विजय डाखोरे , बोईसर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली . सदर पथकास पासकामी सूचना व मार्गदर्शन करून तपास पथके वेगवेगळ्या परिसरात रवाना केलेली होती. सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसतांना कोशल्यपूर्ण गुन्हयाचा तपास करून सपोनि श्रीकांत शिंदे , वाणगांव पोलीस ठाणे व पोउनि शरद सुरळकर , बोईसर पोलीस ठाणे व त्यांचे पथकाने सदर गुन्ह्यात एक आरोपी वय : २१ रा. अंबिवली ठाणे , यास अटक केली . अटक केलेल्या आरोपीकडून कसून चौकशी केली असता त्याने बोईसर व तारापूर पोलीस ठाणे येथील नमूद केलेले ०३ हि गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर आरोपी यांच्या ताब्यातुन २,२१,७००/- रुपये किंमतीचे ६२. ०० ग्रॅम सोने (मंगळसुत्र ) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
सदरची कामगिरी मा. श्री. दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक , पालघर , मा. श्री. प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक , पालघर व श्री. विश्वास वळवी , उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश कदम , पोलीस निरीक्षक , बोईसर पोलीस ठाणे, श्री. श्रीकांत शिंदे, प्रभारी अधिकारी ,वाणगांव पोलीस ठाणे सपोनि श्री. सुरेश साळुंखे , बोईसर पोलीस ठाणे , पोउपनि शरद सुरळकर, पोउपनि विजय डाखोरे, पोहवा शरद सानप , पोना. संदीप सोनावणे , पोअंम. वसावे ,पोअंम.संतोष वाघचौरे , पोअंम.देवेंद्र पाटील , पोअंम.अमित भारवाड , चापोना . किणी यांनी केलेली आहे.
