नायगांव : वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली होती कि दोन इसम चिंचोटी आशानगर इथे गांजा हा अंमली पदार्थ विकण्यास घेऊन येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उप आयुक्त श्री. संजयकुमार पाटील यांना माहिती देवून त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील तसेच वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण पथकाच्या अंमलदारांनी कारवाई करुन मौजे नायगाव पूर्वस्थित चिंचोटी येथील आशा नगर खदानी जवळील पानाच्या टपरी शेजारुन १) प्रदिप शिवदत्त सिंग वय ३० वर्ष २) मैनुद्दिन आयुब शेख वय २५ वर्षे यांना १ किलो १०० ग्रॅम वजनाच्या १०हजार रुपये किंमतीच्या गांजासह रंगेहाथ ताब्यात घेतले. तसेच दोन्ही आरोपी कडुन वालीव पोलीस ठाणे गुन्हयातील चोरी केलेली यामाहा कंपनीची एफ झेड मॉडेलची सिल्वर कलरची मोटार सायकल ताब्यात घेण्यात वालीव पोलीसांना यश आलेले आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. प्रशांत चव्हाण हे करीत आहेत.सदर गुन्हयात अटक करण्यात आलेला आरोपी प्रदिप सिंग हा सराईत अंमली पदार्थ विक्री करणारा असून वालीव पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गुन्हातील फरार आरोपी असून त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्री. पंकज शिरसाठ, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळीज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोनि/ राहूलकूमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोहवा. मनोज मोरे, मुकेश पवार, पो.ना. सचिन दोरकर, राजेंद्र फड, पो.अंम. गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, व जयवंत खंडवी अश्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
