भाईंदर : नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी – रिक्षा चोराकडुन चोरीच्या ३ रिक्षा जप्त करुन ३ गुन्हांची उकल अधिक माहितीनुसार या गुन्हयातील नवघर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील फिर्यादी फुलचंद रामनिहोर पाल, वय – ४७ वर्षे, व्यवसाय- रिक्षाचालक असुन ते MH-04-FC-9916 ही रिक्षा चालवतात. त्यांनी त्यांची रिक्षा दि.२९/०७/२०२३ राञी-चाय सुमारास बालकृष्ण ज्योत बिल्डींग, तलाव रोड, भाईंदर-पुर्व, ठाणे येथे पार्क केली. त्यानंतर ते दुस-या दिवशी दि.३०/०७/२०२३ रोजी पहाटे ०३.०० वा पुन्हा रिक्षा चालवण्यासाठी त्यांची रिक्षा घेण्यासाठी सदर ठिकाणी गेले असता त्यांची रिक्षा त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी मिळुन आली नाही. त्यांची रिक्षा चोरी झाल्याची त्यांनी खात्री झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
मागील काही दिवसांपासुन नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रिक्षा चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने सदरचा गुन्हा हा रिक्षा चोरीचा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर बाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नमुद गुन्हयाचा तपास पोलिसांनी सुरु केला व प्रथम गुन्हयाच्या घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर घटनास्थळ व घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासुन आधारे चोरी झालेल्या परिसरात आरोपीचा शोध घेत असताना २ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा नमुद गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्या ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली असुन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुण रुपये-१,४०,०००/- किंमतीच्या एकुन – ०३ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असुन विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे केलेल्या तपासात रिक्षा चोरीचे एकुन – ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, श्री. उमेश माने-पाटील, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग, विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पालवे, पो.उप निरी. अभिजित लांडे, ज्ञानेश्वर आसबे, पो. हवा. भुषण पाटील, सुरेश चव्हाण, ८ नवनाथ घुगे, जयप्रकाश जाधव, पो. अं. ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांनी केलेली आहे.
