भाईंदर : नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटिकरण कक्षाची कौतुकास्पद कामगिरी. न्यु गोल्डन नेस्ट, डिव्हाईन चर्च समोर फाटक रोड, भाईंदर पुर्व, याठिकाणी दिनांक ०७/११/२०२१ रोजी हनुमान मंदिरात चोरी झाली . मंदिराच्या स्टिलच्या दरवाजाचे लॉक व लोखंडी साखळी तोडुन मंदिरामधील हनुमान भगवान यांची ०१ फुटाची पितळेची मुर्ती तसेच स्टिलची लोखंडी दानपेटी चोरी झाल्याची तक्रार धीरज राजमणी मिश्रा यांनी दिली त्यावरून नवघर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीरांमार्फत माहिती काढुन संशयित इसम राजु बंगाली, वय ३१ वर्षे, रा. भाईंदर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे पोलिसानं समोर कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली. तपासादरम्यान गुन्हयातील मुदेदमालाबाबत आरोपीस विचारले असता मंदिरातील चोरी केलेली हनुमान भगवानची मुर्ती व स्टिलची लोखंडी दानपेटी ही त्याने पंकज गौतमलाल सेवक वय २७ वर्षे, रा. शांती स्वरुप बिल्डींग, रेशन कार्ड ऑफिस जवळ, मिरारोड पुर्व, ठाणे यास विक्री केल्याचे सांगितले त्यानुसार पंकज यास देखील व्यक्तीस अटक करुन त्याच्याकडुन चोरीस गेलेली हनुमान भगवानची पितळेची मुर्ती व स्टिलची लोखंडी दानपेटी हस्तगत करण्यात आली आहे. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हा अवघ्या ०८ तासांत हा गुन्हा उघड नवघर पोलिसांस यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, श्री. शशीकांत भोसले, सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, श्री. प्रकाश मासाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटिकरण कक्षाचे पो.उप.निरी. श्री. संदिप ओहोळ, पो.ना. राहुल लोंढे, पो.शि. गणेश जावळे, सुरज गुणावत, संदिप जाधव यांनी केली आहे.
