वाशी शहरात चेन स्नॅचिंग प्रकारात वाढ झाली असून, या आरोपींचा तपास करण्याकरिता वाशी पोलीस ठाण्याकडून विशेष पथक नेमण्यात आले. सन २०१९/२०२० मधील चेन स्नॅचिंग गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करून सुमारे ७० ठिकाणाचे अधिक सी.सी.टी.व्ही फुटेज पाहण्यात आले आणि तांत्रिक तपास करून गुप्त बातमीदारांकडून माहिती घेऊन शरद तांबे नामक (वय२१) राहायला. पनवेल, याच्याकडून तब्बल २५,०००/- चे मंगळसूत्र आणि २५,०००/-ची सोन्याची चैन मालमत्ता हस्त करण्यात आली.
वाशी पोलीस ठाणे गु.रजि. नंबर. ३६८/२०२०, २५५/२०१९ भा.द.वि कलम ३७९,३९२,३९२,३४ वरुण अटक करण्यात आले. आरोपीकडे अधिक तपासणी करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मालमत्ता विषयीचे आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री.बिपिन कुमार सिंह, माननीय पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ वाशी नवी मुंबई श्री. सुरेश मेंगडे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.विनायक आ वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजीव धुमाळ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद तोरडमल (गुन्हे)गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे व पथक यांनी यशस्वीपणे पार पाडली.
