मिरारोड : दिनांक २०/०७/२०२१ मिरारोड पोलीस ठाण्याचे हद्दीत विधिशा शांती निकेतन सोसायटी , लक्ष्मी आर्ट गॅलरीचे बाजूस , मिरा भाईंदर रोड , मिरा रोड पूर्व , येथे राहणार इसम नाव : परमानंद बालचंदानी , फिल्म प्रोड्युसर हे स्वतः पिक्चरच्या शूटिंग व अक्टरचे काम देण्याचे बहाण्याने मुलींना घरी बोलावून त्याचे साथीदार कन्हैय्यालाल बालचंदाणी व महिला नाव : श्रीमती वनिता इंगळे हे पुरुष गिऱ्हाईकाकडून वेश्यागमनाचा मोबदला स्विकारुन वेश्यागमनासाठी मुली व रूम उपलब्ध करून देतात अशी गोपनीय माहिती मिळाल्याने वपोनि. श्री. पाटील यांनी पथकासह नमूद बोगस गिऱ्हाईक व पंच यांना पाठवून सत्यता पडताळून छापा टाकला असता , वेश्या दलाल परमानंद बालचंदानी व त्यांचे साथीदारांनी बोगस गिऱ्हाईकांकडून वेश्यागमनाचा मोबदला स्विकारुन वेश्यागमनासाठी मुलगी व रूम उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने वेश्यादलाल कन्हैय्यालाल बालचंदाणी व त्यांचे साथीदार परमानंद बालचंदानी , श्रीमती वनिता इंगळे यांना वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेऊन ०२ मुलीची सुटका करण्यात आली. सदरबाबत वेश्यादलाल यांचे विरुद्ध मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ . श्री. महेश पाटील ,पोलीस उप.आयुक्त (गुन्हे ), श्री. रामचंद्र देशमुख, सहा . पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर विभागाचे वपोनि श्री. एस. एस. पाटील ,पो.हवा. उमेश पाटील , विजय ढेमरे, विजय निलंगे , रामचंद्र पाटील, मपोना यंबर , मपोना , कमल चव्हाण , चालक पोना , गावडे ,पोशि , केशव शिंदे , यांनी केली आहे
