दिनांक 10/08/2021 रोजी सकाळी 6.06 वाजता हरीश रामजी राठोड. वय 55 वर्षे राह :- माझगाव ताडवाडी,मुंबई. हे डॉकयार्ड ते पनवेल असा प्रवास करत असताना रे रोड रेल्वे स्थानक फलाट क्र 1 वर आलेल्या लोकल चे मोटरमन बाजूकडील 4 क्रमंकाच्या डब्ब्यातून एक अनोळखी इसम याने फिर्यादी यांचे पाठीमागून येऊन जबरदस्तीने मोबाईल फोन खेचून फलाटावर उडी मारून पळून गेला अशी तक्रार वडाळा रेल्वे पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा रेल्वे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील तपास पथकाने केला असता सीसीटव्ही फुटेज व गुप्त बातमिदाराच्या मदतीने वर नमूद आरोपी नामे मुजीब शरीफ अहमद शहा. वय 20 वर्षे राह रे रोड, माझगाव मुंबई. हा रे रोड स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपासपथकाने योग्य त्या रीतीने सापळा रचून वर नमूद आरोपीस ताब्यात घेतले व त्यास पोलीस ठाण्यात आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कडे वर सदर गुन्हयातील 9,990/- रू किमतीचा एक काळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला. सदरचा गुन्हा हा वर नमूद आरोपीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी तपास पथकाचे पोनि. खूपेरकर स.पो.नि. चव्हाण,स.पो.नि. हावळे,पोलिस हवालदार पाटील, नांगरे,पोलिस नाईक पोळ ,इरलावार,पोलीस शिपाई जगदाळे, कुंडलकर, जाधव, गर्जे.यांनी केली.
