चार वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर भाईंदर पोलीसांनी केली तात्काळ कारवाई

Crime News

दिनांक. २०/१२/२०२० रोजी दुपारी १:००वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला राहायला भोलानगर झोपडपट्टी, भाईंदर (पश्चिम) यांची चार वर्षाची मुलगी त्यांच्या घरासमोर उभ्या लक्झरी बस मध्ये लहान मुलां सोबत खेळत होती. त्यानंतर बस तेथून निघून गेली तेव्हा सर्व मुले खाली उतरले परंतु फिर्यादीची मुलगी बस मध्ये राहिली असल्याचे मुलांनी सांगितले. त्याप्रमाणे मुलीचा नमूद बसमध्ये शोध घेण्यात आला परंतु मुलगी मिळुन आली नाही. म्हणून फिर्यादीच्या तक्रारीवरून बस चालका विरुद्ध भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा रोजी नं. ७१७/२०२० भा.द.वि.स.कलम ३६३ अन्वये दाखल करण्यात आला.

 

सदर घटनेची माहिती भाईंदर पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस उप निरीक्षक किरण दळवी व पथकाने आरोपी बस चालक (वय-३४) राहायला सांताक्रुज (पश्चिम) मुंबई, याची माहिती प्राप्त करून त्यास वसई-माणिकपुर येथून ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने चौकशी केली असता आरोपीने फिर्यादीची चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर बस मध्ये लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्लास्टिक गोणीत भरून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याकडे टाकून दिले असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लगेच पोलीस पथकाने वालीव पोलीस ठाण्याकडे तपास केला व वालीव पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादीची पीडित मुलगी जखमी अवस्थेत मिळून आली. तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यात भा.द.वि.कलम ३७६(२)(आय),३७६(३),३०७,२०१ सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ४,८,१२ समाविष्ट करून आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीची माननीय न्यायालयीन दिनांक.२८/१२/२०२० रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असून गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील ह्या करीत आहेत.

 

सदरची कामगिरी श्री.संजय कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, (अति कार्यभार) मिरा-भाईंदर, डॉ.शशिकांत भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस ठाणे भाईंदर, पोलीस निरीक्षक वनकोटी गुन्हे शाखा (मीरा-भाईंदर), पोलीस निरीक्षक वडाख, गुन्हे शाखा (वसई) पोलीस ठाणे भाईंदर पोलीस उपनिरीक्षक किरण दळवी, पोलीस उप निरीक्षक मनीषा पाटील व तपास पथक यांनी केली.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply