मिरारोड (दि.२०) : बलात्कार व पोक्सो सारख्या गंभीर गुन्हयातील ४ वर्षापासुन पाहिजे असलेल्या आरोपीस अटक – मिरारोड पोलीस ठाणेची कामगिरी.मिळालेल्या माहिती नुसार मिरारोड पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेले तसेच शारिरीक संबंध ठेवलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्यावरून मिरारोड पोलीस ठाणेत दिनांक ०४/०३/२०१९ रोजी बालकांचे लैगिक अपराधापासुन संरक्षण ,बालविवाह अधिनियम २००६ चे कलम ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील पिडीत मुलगी ही मिळुन आलेली होती परंतु गुन्हयातील मुख्य आरोपी गेले ४ वर्षापासुन पोलिसांना मिळून येत नव्हता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांन गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलिसांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मिरारोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी सदर गुन्हयाचा तपास पोउपनि श्री. किरण वंजारी, गुन्हे प्रकटीकरण कक्ष, मिरारोड पोलीस ठाणे यांचेकडे सुपुर्द केलाहोता.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लषणाव्दारे प्राप्त माहितीच्या अधारे आरोपी रईस शरीफ शेख, रा. ओम शांती चौक, शांतीपार्क, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे मुळ रा. आग्रा, राज्य उत्तर प्रदेश यास दिनांक १६/०६/२०२३ रोजी ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. .
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ -१, मिरारोड, श्री. महेश तरडे, सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह बागल, स. पो. नि. शिवकुमार गायकवाड तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. हनिफ शेख, पो.उप.नि. किरण वंजारी, स.फौ. प्रशांत महाले,पो. हवा. प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, पो. अंम. अथर्व देवरे यांनी केलेली
