गुन्हे शाखा, काशिमीरा युनीट-१ चे पोलीस निरक्षक जितेंद्र वनकोटी त्यांच्या पथकासह मिरा-भाईंदर परिसरात पेट्रोलींग करित होते.
मिरागावठाण, डेल्टागार्डन बिल्डीग समोरील पाण्याच्या टाकी समोरील रोडवर काशिमीरा मिरारोड पुर्व येथे ऑटो रिक्षा मध्ये एक इसम आडोशाला हातात प्लास्टीकची गोणी घेवुन संशयास्पद रित्या बसलेला दिसुन आला. पोलीसांना पाहताच तो पळुन जायचा प्रयत्न करू लागली.
सदर आरोपीचे वय ३७ वर्षे रा. जोगेश्वरी मुंबई यास ताब्यात घेवुन झडती घेतली. तेव्हा त्याच्या ताब्यात गांजा विक्री करुन प्राप्त केलेले रोख १९,७००/- रुपये, ०४ किलो गांजा अंमलीपदार्थ, किंमत ६०,०००/- रुपयेचा बेकायदेशीरीत्या ताब्यात बाळगतांना पोलीसांना मिळुन आले.
सदर आरोपीला मुद्देमाल, ऑटो रिक्षा सह जप्त करण्यात आले. त्यावरून आरोपी विरुध्द काशिमीरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १३०/२०२० एन.डी.पी.एस.ऍक्ट ८(क),२०(ब) (IT) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील गुन्हयाचा तपास काशिमीरा पोलीस ठाणे करित आहेत.
सदरची कारवाई श्री. विजयकांत सागर, पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-१ काशिमीरा युनीट-१ चे पोनि/जितेंद्र वनकोटी, पोहवा/गर्जे, पोशि/सुशिल पवार, सतीश जगताप यांनी केली आहे.
