घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर, पथकाने केली कारवाई .

Crime News

मिरारोड : दिनांक : २९/०६/२०२१ रोजी रात्री ८. ०० वा , सुमारास गुप्त बातमीदाराचे मार्फत मिळालेल्या माहिती नुसार , शांती गार्डन रु.नं ३०२, बिल्डींग नं ११, सेक्टर ६, मिरारोड (पु)  येथे घरात जुगार चालू आहे असे समजले . या मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून झडती वॉरंट प्राप्त करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर  पथकाने पंचासह ९ वा . चे सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता, घरामध्ये ०८ स्त्री ,पुरुष पैसे लावुन तीन पत्याचा  जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले तसेच त्यांच्या जवळ ५२ पत्त्यांच्या पानाचे दोन कॅट , २६९ पोकर चिप्स व रोख रक्कम २१,८४०/-रु. असे मिळून आल्याने त्याबाबत सविस्तर पंचनामा करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर विषयी पोशि /३६६० केशव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई डॉ . श्री. महेश पाटील ,पोलीस उप.आयुक्त (गुन्हे) , श्री. रामचंद्र देशमुख , सहा . पोलीस आयुक्त (गुन्हे) , यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर विभागाचे व पो. नि. श्री. संपतराव पाटील , पोशि . केशव शिंदे, मपोना . यंबर , काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोशि. गिरासे , पोशि. हरणे यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply