नायगाव – घरफोडी चोरी करणा-या आरोपीनां अटक ५ गुन्हयांची उकल करण्यास गुन्हे शाखा कक्ष- २ वसई यांची कामगीरी.
नायगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मालती यादव वय ४८ वर्ष व्यवसाय नोकरी रा. रुम.नं.०३ महादुर्गा वेलफेअर सोसायटी, रामधाम आश्रमसमोर काजुप्लाट वाकीपाडा नायगाव पुर्व, ता. वसई यांच्या घराचे पत्रे उचकटुन त्यावाटे दिनांक २५/०७/२०२३ रोजी रात्रीच्या दरम्यान कोणत्या तरी अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन घरफोडी करुन चोरी करुन पळुन गेले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाणे येथे दि. २६/०७/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये सतत होणा-या घरफोडी चोरींचे प्रमाण वाढत असल्याने सदर घरफोडी चो-यांवर आळा घालणेबाबत मा. वरीष्ठांनी पोलिसांना ओदशित केले होते. त्या अनुषंगाने घडणा-या प्रत्येक घरफोडी चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून गुप्त बातमीदाराकडील माहीती व सी सी टी व्ही फुटेजच्या परीक्षणाव्दारे अनोळखी आरोपींचा गुन्हे शाखा कक्ष -२ वसई यांच्या मार्फतीने शोध घेण्यात येत होता. त्यानुसार नायगाव येथील घरफोडी चोरीच्या गुन्हयांतील आरोपीच्या नावाची उकल करुन त्यास सापळा रचुन आरोपी धिरज गुलाब मौर्या वय २० वर्ष रा. चिंचोटी तलावाचे जवळ, वसई पूर्व मुळ रा ज्ञानदुर रोड, जिल्हा – भदोई, राज्य – उत्तर प्रदेश यास पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी याच्यावर नायगाव पोलीस ठाणे, मांडवी पोलीस ठाणे, तुळींज पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे, नालासोपारा पोलीस ठाणे असे एकुण ०५ घरफोडीचे व ईतर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपी याचेकडुन उघडकीस आणलेल्या घरफोडी व ईतर चोरीच्या एकुण ५ गुन्हयात एकुण ४,९४,०००/- रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा – २ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, स.पो.नि. सुहास कांबळे, सागर शिंदे, स.फौ. रमेश भोसले, संजय नवले, पो. हवा. प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, पो.ना. प्रशांतकुमार ठाकुर, पो.अं. अमोल कोरे, सायबर शाखेचे स. फौ. संतोष चव्हाण, म. सु. ब. अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली. आहे.
