वालिव : वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी करणारे ०३ आरोपीतांस अटक करुन एकूण १२,८६,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्याचे हददीत दिनांक १८/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता ते दिनांक १९/०७/२०२२ रोजी १०.०० वा. चे दरम्यान इको टेक रिसायकलिंग नावाच्या कंपनीचे लॉक तोडुन सुमारे १२,८६,६००/- रुपये किंमतीचे जूने लॅपटॉप व जुन्या हार्ड डिस्कची घरफोडी करून चोरी झाल्याबाबत कंपनीचे मालक यांनी वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द तक्रार दाखल केली होती त्यावरून आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तांत्रिकदृष्टया तपास करुन व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे इको टेक रिसायकलिंग कंपनीत चोरी करणारे आरोपी १) मोहम्मद मेहताब अन्वर अली, वय २९ वर्षे, रा. नालासोपारा पुर्व २) करीमुद्दीन उर्फ छोट जलालुद्दीन खान, वय २४ वर्षे , रा. जोगेश्वरी पुर्व ३) ईकरामुद्दीन जलालुद्दीन खान वय ३२ वर्षे, रा. जोगेश्वरी पुर्व यांना वालिव पोलिसांनी अटक केली . सदर गुन्हयात आरोपींकडून १२,७१,६०० /- रुपये किंमतीचे डेल व एच.पी. कंपनीचे १८७ लॅपटॉप, १५,०००/- रुपये किंमतीच्या डी. डब्ल्यु. सी. सेट व इतर कंपनीच्या १५० हार्ड डिस्क असा एकुण १२,८६,०००/- रुपये किंमतीचा मुदेदमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ वसई, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, श्री. कैलास बर्वे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे, श्री. राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे, स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.हवा. मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, पो.ना. सचिन दोरकर, सतिश गांगुर्डे, पो.अंम. गजानन गरीबे, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी केली.
