भाईंदर दि. ०९.०८.२०२१ रोजी ओम दिपक पोतदार, वय १९ वर्षे, हे कामानिमीत्त घराबाहेर गेले असतांना अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन लोखंडी कपाटाचे लॉकर मधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच घरात ठेवलेले ३ मोबाईल फोन असा एकुण ०२,५६,७४०/- रु. कींमतीचा चा माल घरफोडी चोरी करुन नेला होता. सदर बाबत ओम दिपक पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवघर पोलीस ठाणे प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मिरा-भाईंदर पसिरात घरफोडी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता गुन्हयाची लवकरात लवकर उकल होण्याबाबत मा. वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ व आजुबाजुचे परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरांची पडताळणी केली. पडताळलेल्या फुटेजचे त्याअनुषंगाने एक संशईत इसम फिर्यादी यांचे सोसयटीत जातांना व सोसायटीतुन पांढ-या रंगाचा डगला (पिशवी) घेवुन जातांना दिसुन आला. त्या अनुषंगाने सातत्यपुर्ण नमुद संशईत इसमाचा शोध घेतला असता तो भाईंदर रेल्वे स्टेशनने ट्रेन मध्ये बसुन नालासोपारा येथे उतरुन प्रगतीनगर,नालसोपारा पुर्व, येथे उतरला असल्याचे निष्पन्न झाले. नमुद संशईत इसमाचा शोध घेण्याकरीता पोलीसांनी एकुण ७० ते ८० सी.सी.टि.व्ही.कॅमेरांची पडताळणी केली. सदर पसिरात संशईत इसमाचा बातमीदारांमार्फत माहिती घेवुन त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण व कसुन तपास करता त्याने वरील प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली. नमुद अटक आरोपी कडुन त्याने घरफोडी चोरी केलेली संपुर्ण मालमत्ता हस्तगत करुन अवघ्या ४८ तासांत गुन्हयाची उकल करुन उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
आरोपीचा अभिलेख पडताळणी करता त्याचेविरुध्द माटुंगा,डी.बी.मार्ग,व्ही.पी.रोड, समतानगर पो. ठाणे, मुंबई तसेच तुळींज पो.ठाणे,मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय, अशा ठिकाणी १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळुन आलेली आहे.
सदरची कामगिरी श्री. सदानंद दाते., पोलीस आयुक्त.,मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय, श्री. एस.जयकुमार,अपर पोलीस आयुक्त श्री. अमीत काळे,पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-०१, डॉ.शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग, श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे. पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/योगेश काळे, पोउनि/संदिप ओहळ, पोनारविंद्र भालेराव, पोना ऐन्नोद्दीन शेख, पोशि संदिप जाधव,पोशि युनुस गिरगावकर, पोशि अनील सुर्वे, यांनी केला आहे.
