भाईंदर : घरफोडी करून पाच लाखाचा माल लंपास करणाऱ्या ४ चोरांना नवघर पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार सौ. ईशा दवे, वय ३७ वर्षे या दिनांक ६/१२/२०२१ इद्रलोक भाईंदर पुर्व येथे रुम पाहण्यासाठी गेल्या असताना दुपारी घरी परत आल्यावर बघितले कि त्याच्या राहत्या घराचे लॉक तोडून त्याच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व त्यांच्या कपाटात ठेवलेले २ सोन्याचे नेकलेस, ४ सोन्याच्या बांगडया, १ सोन्याचे मंगळसुत्र, १ सोन्याची चैन, चांदीचे पैजन, कडे व कमरबंद असे एकुण ५,५०,०००/- रु. किंमतीचे सोने व चांदीचे दागिन्यांची चोरी झालेले दिसुन आले. सदरबाबत ईशा दवे, यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नवघर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनास्थळावरील प्राप्त पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हयाचा तपास केला असता गुन्हयातील आरोपी हे राजस्थान, हैद्राबाद व कर्नाटक राज्यामध्ये असल्याचे पोलिसांनी कळून आले व त्यांनी संशयीताबाबत अधिक माहिती प्राप्त करुन आरोपी १) भरतकुमार मोतीराम कुमावत, वय ३३ वर्ष, रा. जि. पाली व २) चेलाराम मोडाराम देवासी, वय २४ वर्षे, रा. जि. पाली, राज्यराज्यस्थान यांना दिनांक ६/५/५०२२ रोजी अटक केली . अटक आरोपीकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा गुन्हयातील पाहिजे आरोपी ३) हकमाराम चौधरी, रा. जालोर, राज्यस्थान याचेसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हयात आरोपी ४) चंदनसिंग भवरसिंग राजपुत, वय ३६ वर्षे, मुळ रा. जि. राजसमंद, राज्य-राजस्थान याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यासदेखील दिनांक ११/५/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. गुन्हयाच्या तपासात आरोपींन कडुन ४,०७,२३९/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयातील अटक आरोपी भरतकुमार चौधरी याच्या विरुध्द महाराष्ट्र व हैद्राबाद अशा राज्यातील वेगवेगळे पोलीस ठाणे अंतर्गत घरफोडी चोरीचे एकुण २२ गुन्हे दाखल असुन काही न्यायालयाने त्याच्या विरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळुन आलेली आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा. पो.आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/अभिजीत लांडे, पोहवा/भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/संदिप जाधव, सुरज घुनावत, ओमकार यादव, विनोद जाधव यांनी केलेली आहे.
